मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING : नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

BREAKING : नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

 गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे त्यांना तातडीने कारागृहातून स्ट्रेचरवर घेऊन जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई, 02 मे : मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आज त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांना स्ट्रेचरवर घेऊन तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. . (Maharashtra Minister Nawab Malik admitted to JJ Hospital Mumbai)

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज त्यांच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे त्यांना तातडीने कारागृहातून स्ट्रेचरवर घेऊन जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच रिमांडला विरोध करण्यासाठी नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केला होता. स्टेज II च्या क्रॉनिक किडनी रोगामुळे त्याला पाय दुखणे आणि सूज येण्याची तक्रार आहे. तुरुंगात त्याला वेदनाशामक औषध देण्यात आले आहे, जे या रोगासाठी चांगले नाही. सर जेजे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषध दिलेले नाही. आरोपीच्या तक्रारीच्या अनुषंगाने, मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांना आरोपीच्या आजाराचा क्रमिक अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

याआधीही नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती बिघडली होती, त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

First published:

Tags: Nawab malik