मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: या कारणामुळे नाना पटोलेंनी स्थगित केलं फडणवीसांच्या घराबाहेरील आंदोलन, भाजपचा जल्लोष

VIDEO: या कारणामुळे नाना पटोलेंनी स्थगित केलं फडणवीसांच्या घराबाहेरील आंदोलन, भाजपचा जल्लोष

मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेलं आजचं आंदोलन थांबवत असल्याचं सांगितलं.

मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेलं आजचं आंदोलन थांबवत असल्याचं सांगितलं.

मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेलं आजचं आंदोलन थांबवत असल्याचं सांगितलं.

मुंबई 14 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या जनतेचा अपमान केला आहे असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. यामुळे मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थान बाहेर आंदोलन (Congress Protest in Mumbai) केलं जाणार असा इशारा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. मात्र, आता हे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेलं आजचं आंदोलन थांबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

यानंतर सागर निवासस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis on Congress Protest) भाजपा नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळी फडणवीस म्हणाले, तुम्हा सर्वांचे आभार. तुमची ताकद एवढी आहे की हे निदर्शन पण करू शकत नाहीत.काँग्रेसने खरंतर देशाची माफी मागायला पाहिजे कारण यांनीच कोरोना पसरवला, असंही ते म्हणाले.

''2024 ला राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार'',नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर

नाना पटोले यांनी याबाबत बोलताना म्हटलं की संस्कृती आणि संस्काराचे दाखले देत यांना राजकारण करावं लागतं, ते आम्ही करत नाही. पंतप्रधाननांच्या खुर्चीवर बसून मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्याचा अपमान सहन केला जाणार नाही

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा नाना पटोले यांनी केली होती. तर याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपनं दिलं होतं. 'सागर' बंगल्यावर मोर्चा नेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. काँग्रेसच्या आंदोलनापूर्वी फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेल्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. तर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे.

मुंबईत उद्या काँग्रेस-भाजपात हिंसाचाराची शक्यता, नेमकं काय घडतंय?

आंदोलनकर्त्या नाना पटोले यांना पोलिसांनी त्यांच्या घराबाहेरच थांबवलं. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड बाहेर जाण्याचा साधा प्रयत्नही आंदोलकांनी केला नाही आणि काही वेळातच नानांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली

मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. नाना पटोले यांच्या निवासस्थानी मरिन ड्राईव्ह पोलिसांचा ताफा तैनात होता. नाना पटोले यांना ताब्यात घेण्यासाठी गाडीही तैनात होती. पण पोलिसांना फार प्रयत्न करावे लागले नाहीत

First published:

Tags: BJP, Nana Patole, काँग्रेस