मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बुर्खा घालण्यास नकार दिला, रागाच्या भरात मुस्लीम पतीने हिंदू पत्नीला दिला भयंकर शेवट

बुर्खा घालण्यास नकार दिला, रागाच्या भरात मुस्लीम पतीने हिंदू पत्नीला दिला भयंकर शेवट

मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 27 सप्टेंबर : मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील एका तरुणाने आपल्या 23 वर्षीय पत्नीची दिवसाढवळ्या सुऱ्याने गळा चिरून हत्या केली. ही घटना टिळक नगर भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली हिंदू होती. तर तिचा पती मोहम्मद इकबाल शेख मुस्लीम.

तीन वर्षांपूर्वी दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. इकबाल आणि त्याचे कुटुंबीय नेहमी रुपालीला मुस्लीम पद्धतीत पाळणे आणि बुर्का घालण्यासाठी सांगत होते. मात्र रुपालीला हे मान्य नव्हतं.

घटस्फोटाची केली मागणी..

यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. ज्यानंतर रुपाली इकबालपासून वेगळं राहू लागली. यानंतरही दोघांमध्ये फोनवरुन बोलणं होत होतं. सोमवारी इकबालने रुपालीला भेटायला बोलावलं आणि या मुद्द्यावरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात रुपालीने घटस्फोट देणार असल्याचं म्हटलं. सुरुवातील तर इकबाल मुलाचं नाव सांगून तिची मनधरणी करीत होता. मात्र जेव्हा रुपाली घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम राहिली तर तो रुपालीला गल्लीत खेचून गेला. येथे सुऱ्याने तिच्यावर गळ्यावर वार केले. यानंतर रुपालीने आरडाओरडा सुरू केला. मात्र काही वेळात जागीच रुपालीचा मृत्यू झाला.

मृतदेहासोबत 17 महिने राहणाऱ्या कुटुंबीयांनी उपचारासाठी 30 लाख केले खर्च; शवाला ऑक्सिजन, ग्लुकोज अन् रेमिडिसीवीरही दिलं

गळ्यावर फिरवला सुरा...

यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. लोकांना पाहताच इकबाल घटनास्थळाहून फरार झाला. मात्र शेवटी पोलिसांनी त्याला पकडलं. चौकशीत इकबालने सांगितलं की, हे त्याचं दुसरं लग्न होतं. यापूर्वीही त्याने एक लग्न केलं होतं. मात्र पहिल्या पत्नीपासून मूल न झाल्याने इकबालने तिला तलाक दिला. तीन वर्षांपूर्वी त्याने रुपाली नावाच्या एका हिंदू तरुणी रुपालीसोबत लग्न केलं. रुपालीच्या हत्येनंतर तिच्या बहिणीने सांगितलं की, इकबाल तिच्यावर मुस्लीम धार्मिक पद्धतीचं पालन करावं म्हणून जबरदस्ती करीत होता.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Muslim