मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai Traffic Updates : दहीहंडी अन् लाँग वीकेंडचा वाहतूकीला बसू शकतो फटका, या रस्त्यांवरून प्रवास टाळा

Mumbai Traffic Updates : दहीहंडी अन् लाँग वीकेंडचा वाहतूकीला बसू शकतो फटका, या रस्त्यांवरून प्रवास टाळा

Mumbai Traffic Updates : दहीहंडी अन् लाँग वीकेंडचा वाहतूकीला बसू शकतो फटका, या रस्त्यांवरून प्रवास टाळा

Mumbai Traffic Updates : दहीहंडी अन् लाँग वीकेंडचा वाहतूकीला बसू शकतो फटका, या रस्त्यांवरून प्रवास टाळा

Mumbai Traffic updates today: मुंबई आणि ठाण्यामधील अंतर्गत रस्त्यांवर विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवामुळे मंडप उभारण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे आज आणि उद्या या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ शकते.

    मुंबई, 18 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह परिसरात सुरु असलेला मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील खड्डे तसेच चार दिवसांच्या सुट्ट्यांनंतर रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ वाढल्यानं काल मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विविध रस्स्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी (Traffic Jam in Mumbai) झाली होती. मुंबई-नाशिक महामार्ग, शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, काटईनाका ते शिळफाटा, शिळफाटा ते तळोजा-पनवेलमार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग, जुना आग्रा रोड, मुलुंड – ऐरोली मार्ग या भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आजसुद्धा हीच परिस्थिती असल्यामुळं मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. तसेच लाँग वीकेंडमुळं रस्त्यांवर गर्दी होऊ शकते.  त्यामुळं मुंबईकरांनी वाहतूक कोंडीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं. काल दुपारी नवी मुंबईतील ऐरोली खाडी वाहतूक दुपारपासून ठप्प झाली होती.तसेच शिळफाटा ते तळोजा-पनवेलकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याशिवाय मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूल आणि खारेगाव खाडी पुलावर खड्डे पडल्यामुळं या रस्त्यावरील वाहतूकही धिम्या गतीनं सुरु होती. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात केवळ रात्री 12 ते 4 या वेळेतच अवजड वाहनांना परवानगी आहे. परंतु येथील रस्त्यांवरील खड्डे मुजविण्याच्या कामांमुळे निश्चित वेळनंतरही ही वाहतूक सुरुच होती. त्यामुळं रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मुख्य रस्त्यांवरील गर्दींमुळं अनेक वाहनधारकांनी पर्यायी रस्त्यांची निवड केल्यामुळे अनेक अंतर्गत रस्ते जॅम झाले. एक-दोन किमी अंतरासाठी वाहनधारकांना एक-दोन तास रस्त्यांवर अडकून पडावं लागलं. यामुळं वाहनधारक तसेच प्रवाशांचेही मोठे हाल झाले. दरम्यान आजही हीच परिस्थिती असल्यामुळं आजही प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. हेही वाचा- मुंबईकरांसाठी डबल धमाका! गारेगार आणि डबल डेकरचा प्रवास सोबतच पुढील दोन दिवस मुंबईमध्ये होऊ शकते वाहतूक कोंडी-  मुंबईसह परिसरात आजही मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आजही वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यातच राज्य रस्ते विकास महामंडळाकडून अनेक भागांत खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे, याचाही परिणाम वाहतूकीवर होऊ शकतो. तसेच उद्या मुंबई, ठाण्यातील अनेक ठिकाणी दहिहंडी उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे अनेक रस्ते जॅम होऊ शकतात. काही अंतर्गत मार्गावर दहीहंडी सोहळय़ासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू असून यामुळेही कोंडीत भर पडू शकते.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Mumbai News, Traffic

    पुढील बातम्या