मुंबई, 17 मार्च : मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई सत्र न्यायालयान (Session Court) मोठा दिलासा आहे. सोमवारपर्यंत प्रवीण दरेकर यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. तसंच, प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला आहे.
प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिकादाखल करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले होते. आज पुन्हा एकदा या प्रकरणी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज सत्र न्यायालयात सरकारी वकीलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत दरेकर यांना अटक करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाने तक्रार केली होती. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबै बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला असं आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी म्हटलं आहे.
सहकार विभागाने बजावली होती नोटीस
प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आताही त्यांनी प्रतिज्ञा मंजूर संस्थेमार्फत मुंबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला. मात्र दरेकर मजुर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली होती. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली होती. तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले होते. दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुद करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Pravin darekar