मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pravin Darekar: प्रवीण दरेकरांची मुंबई पोलिसांकडून तीन तास चौकशी, पोलीस ठाण्यातून बाहेर येताच दरेकरांनी केला गंभीर आरोप

Pravin Darekar: प्रवीण दरेकरांची मुंबई पोलिसांकडून तीन तास चौकशी, पोलीस ठाण्यातून बाहेर येताच दरेकरांनी केला गंभीर आरोप

Pravin Darekar

Pravin Darekar

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केली. तब्बल 3 तास दरेकरांची चौकशी करण्यात आली.

मुंबई, 4 एप्रिल : मुंबै बँक (Mumbai bank) बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दरेकरांची तब्बल तीन तास चौकशी केली. ही चौकशी संपल्यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर प्रवीण दरेकर यांनी अत्यंत गंभीर आरोप सरकारवर केला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, सभासद म्हणून काय लाभ घेतला? बँकेकडून काय लाभ घेतला? असे अनेक प्रश्न तीन तासांत विचारले गेले. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की, आम्ही सहकार्याला तयार आहोत. अनेक उलट-सुलट तेच-तेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्यांची नियत साफ आहे त्यांच्यावर अशा गोष्टींचा परिणाम होत नाही. अत्यंत मुद्देसुद तपशीलवार जे-जे विचारलं त्याची उत्तरे आम्ही दिली.

बरेचशे प्रश्न विचारले. खरं तर हा गुन्हा फक्त एका संस्थेपुरता आणि सभासदत्व मजूर हे बोगस असल्यापुरता सिमित असताना इतर संस्था, बँक, इतर अनेक विषयांसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तरी पण तपासा अंतर्गत जी माहिती आहे ती त्यांना दिली. तपासा दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त त्या ठिकाणी मॉनिटर करत होते. त्यांचा दबाव असल्याचं दिसून येत होतं. जे अधिकाऱ्यांनी माहिती घेतली त्यांनी अधिकारी म्हणून जे करायला हवं ती माहिती विचारत होते. आम्हाला माहिती असलेली सर्व माहिती आम्ही दिली असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

वाचा : नितीन गडकरी -राज ठाकरेंची भेट; 2 तासांच्या भेटीत काय झाली चर्चा, गडकरी म्हणाले..

चार-पाच वेळेला पीआय केबिनमध्ये गेले, बाहेर गेले. आता नेमके कोणाचे फोन होते हे मला कळालं नाही पण सहा- सात वेळा फोन आले हे खरं आहे. माझा फोन चार्जिंगसाठी बंद करुन ठेवण्यात आला होता. माझा समज झाला की, फोन काढुन बंद केला असंही दरेकर म्हणाले.

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, आवश्यकता वाटल्यास पुन्हा बोलावू असं सांगितलं आहे. जेव्हा-जेव्हा बोलवतील आणि जी माहिती आवश्यक आहे ती आम्ही देऊ. पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं दिसत आहे. सरकारी कार्यालयातून हा गुन्हा दाखल कऱण्याच्या संदर्भात पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात सरकारचा दबाव असल्याचं प्रत्यक्ष जाणवत होतं.

First published:

Tags: BJP, Mumbai police, Pravin darekar