मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai Hotel Marathi Song : मराठी गाण्यांवरुन हॉटेल चालकालाच 'वाजवली'; मनसेचं खळखट्याक, पाहा Video

Mumbai Hotel Marathi Song : मराठी गाण्यांवरुन हॉटेल चालकालाच 'वाजवली'; मनसेचं खळखट्याक, पाहा Video

 हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास बंदी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावरून मनसेने राडा केला आहे.

हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास बंदी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावरून मनसेने राडा केला आहे.

हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास बंदी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावरून मनसेने राडा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 24 नोव्हेंबर : मुंबईतील वाशी येथील एका हॉटेलमध्ये खाजगी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना पार्टीचे देण्यात आली होती. या पार्टीदरम्यान हॉटेलमध्ये विविध गाण्यांच्या तालावर सगळेच नाचत होते. यावेळी कंपनीतील बरेच कामगार मराठी असल्याने हॉटेल प्रशासनाकडे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणी वाजविण्याची विनंती केली. परंतु या हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास बंदी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावरून मनसेने राडा केला आहे. मनसेकडून या घटनेचा निषेध करत हॉटेल चालकाला चांगलाच चोपला आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील वाशी येथे हॉटेलमध्ये खाजगी कंपनीकडून कामगारांसाठी पार्टीचे आयोजीत करण्यात आली होती. यावेळी हॉटेलमध्ये विविध भाषेतील गाण्याच्या तालावर सगळेच नाचत होते. इव्हेन्ट ऑर्गनायझर आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणी वाजविण्याची विनंती हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे केली. परंतु या हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास बंदी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा : संजय राऊत सुटले, नवाब मलिकांचं काय? आता 30 तारखेला येणार फैसला

वारंवार विनंती करूनही मराठी गाणी वाजविण्यासाठी नकार दिला जात असल्याची बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी हॉटेल चालकाला देखील मराठी गाणी वाजविण्याची विनंती केली. परंतु यावेळी देखील हॉटेल चालकाने देखील मराठी गाणी वाजविण्यास नकार दिला. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून हॉटेल विरोधात  नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर हॉटेल संचालकांनी गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : कर्नाटक आणि पाकिस्तानमध्ये काय फरक, सीएम बोम्मईंवर नीलम गोऱ्हेंचा प्रहार

दरम्यान ही बाब मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी हॉटेल प्रशासनाला धारेवर धरत हॉटेल चालकाला चांगलाच चोप दिला आहे.

First published:

Tags: Crime, MNS, Mumbai