मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईत पत्त्यासारखी कोसळली 4 मजली इमारत, LIVE VIDEO आला समोर

मुंबईत पत्त्यासारखी कोसळली 4 मजली इमारत, LIVE VIDEO आला समोर

मुंबईमध्ये एकीकडे दहीहंडीचा उत्साह सुरू आहे. या आनंदाच्या वातावरणात एक मोठी दुर्घटना घडली आहे. तील बोरिवली परिसरात धक्कादायक घटना समोर आली.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 19 ऑगस्ट : मुंबईमध्ये एकीकडे दहीहंडीचा उत्साह सुरू आहे. या आनंदाच्या वातावरणात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बोरिवली परिसरात धक्कादायक घटना समोर आली. चार महिली इमारत कोसळली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. बोरिवली भागात चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारत कोसळतानाची दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली. प्राथमिक माहितीनुसार या इमारतीमध्ये 7 ते 8 कुटुंब राहात असल्याची माहिती आहे. स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. 12 जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही इमारत ३५ वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या इमारतीचं नाव गीतांजली असल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी 12: 45 च्या सुमारास ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. दरम्यान या अपघातामध्ये शेजारच्या फुटपाथावर राहणारे काही व्यक्ती देखील जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या