मुंबई, 25 मार्च : प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दरेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आता मुंबई सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
प्रथमदर्शनी पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याचे दिसून आले आहे असं न्यायालयाने म्हटलं असून त्याच्या आधारेच प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. प्रविण दरेकर यांचा जामिन अर्ज फेटाळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी 2017 मध्ये मजूर म्हणून संस्थेकडून मोबदला स्वीकारला आहे आणि त्यावेळेस ते नागपूरला होते अशी माहिती समोर आली आहे.
वाचा : मुख्यमंत्री कडाडले, "टीका करण्यापेक्षा दाऊदला घरात घुसून मारा, दाखवा मर्दपणा'
हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रवीण दरेकर यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज केला आहे की, आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात अपील करायचं आहे आणि जोपर्यंत आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आम्ही अर्ज करत नाही तोपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.
वाचा : 'सत्ता पाहिजे ना, मी येतो तुमच्या सोबत पण...' मुख्यमंत्र्यांची भाजपला थेट ऑफर
यानंतर न्यायालयाने प्रविण दरेकर यांना पुन्हा एक दिलासा दिला आहे. न्यायालयाने प्रवीण दरेकर यांना मंगळवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
दरेकर मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा दोन महिन्यांनी मुंबै बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला असं आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Pravin darekar