मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबै बँक प्रकरणात Pravin Darekar यांच्याविरोधात गुन्हा दाखल Devendra Fadnavis यांनी मविआ सरकारवर केला गंभीर आरोप

मुंबै बँक प्रकरणात Pravin Darekar यांच्याविरोधात गुन्हा दाखल Devendra Fadnavis यांनी मविआ सरकारवर केला गंभीर आरोप

मुंबै बँक प्रकरणात Pravin Darekar यांच्याविरोधात गुन्हा दाखल Devendra Fadnavis यांनी केला गंभीर आरोप

मुंबै बँक प्रकरणात Pravin Darekar यांच्याविरोधात गुन्हा दाखल Devendra Fadnavis यांनी केला गंभीर आरोप

Devendra Fadanvis on Pravin Darekar: प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

मुंबई, 15 मार्च : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेवर (Mumbai Bank) निवडून येताना प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचं नमूद केलं होतं. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांत (Mumbai Police) तक्रार दाखल झाली होती आणि त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, या संदर्भातील फॉलोअप मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करत होतं अशी माहिती आमच्याकडे आहे. मी कालच सांगितलं होतं की, नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे हे आल्यानंतर रोज सत्तापक्षाच्या वतीने सांगण्यात यंतंय आम्ही सहा-सात जणांची यादी संजय पांडे यांच्याकडे दिली आहे. त्यात पहिलं नाव प्रवीण दरेकर यांचं आहे. ते आम्हाला आज प्रत्यक्षात लक्षात आलं आहे. आम्ही याला घाबरत नाही. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले... आम्ही न्यायालयात जावू, आंदोलन करु, जनतेच्या दरबारात जावू पण भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण आम्ही बंद करणार नाही.

वाचा : पुढील तीन महिने वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली घोषणा

मला कल्पना आहे की, अनेक खोटे गुन्हे दाखल होतील. पण लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे. मी या सरकारला इतकंच सांगू इच्छितो की, जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे त्यांनी लक्षात ठेवावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

प्रवीण दरेकरांना अटक करा - शिवसेना

प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल होताच शिवसेनेने त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटलं, जर विरोधी पक्षनेत्यावर एफआयआर दाखल झाला असेल तर त्यांना या सभागृहात येण्याचा नैतिक अधिकार नाहीये. त्यांना या पदावरदेखील राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचा भाजपने राजीनामा घेतला पाहिजे. आज आम्ही महाविकास आघाडी सरकारमधील विधानपरिषदेतील सर्व आमदारांनी मागणी केली की त्यांना अटक केली जावी.

वाचा : मुंबै बँक: प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल

'दरेकर आडनावाचं दरोडेखोर केलं'

नाना पटोले म्हणाले, भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केली तर ती सुडबुद्धीने असते आणि जो करेल तो भरेल असं ते सांगतात. पण बँकच लुटली गेली आणि दरोडा टाकला गेला... दरेकर आडनावाचं त्यांनी दरोडेखोर आडनाव केलं. हे सर्व ऑडिटमध्ये आलेलं आहे. हा आरोपच नाही तर सहकार विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे. सहकार विभागाला अशाप्रकारे सहकारी बँक लुटणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे.

First published:

Tags: Budget, Devendra Fadnavis, Maharashtra Budget, Pravin darekar