मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राऊतांना जेलमध्ये भेटायला गेले खासदार आणि आमदार, प्रशासनाने परत पाठवले

राऊतांना जेलमध्ये भेटायला गेले खासदार आणि आमदार, प्रशासनाने परत पाठवले

 आर्थर रोड तुरुंगात संजय राऊत यांना भेटण्यास आलेल्या एक खासदार आणि दोन आमदारांना तुरुंग प्रशासनानं नकार दिला.

आर्थर रोड तुरुंगात संजय राऊत यांना भेटण्यास आलेल्या एक खासदार आणि दोन आमदारांना तुरुंग प्रशासनानं नकार दिला.

आर्थर रोड तुरुंगात संजय राऊत यांना भेटण्यास आलेल्या एक खासदार आणि दोन आमदारांना तुरुंग प्रशासनानं नकार दिला.

मुंबई, 10 ऑगस्ट : मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना अटक करण्यात आली. सध्या न्यायालयीम कोठडीत मुक्कामआर्थर रोड कारागृहात आहे. मात्र, आर्थर रोड जेलमध्ये एक खासदार आणि आमदार भेटण्यासाठी गेले असल्याची बाबसमोर आली. पण जेल प्रशासनाने परवानगी नाकारली. पत्राचाळ प्रकरणामध्ये मनी लाँड्रिंगचा आरोपाखाली संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी राऊत यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ऑर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आले आहे. मात्र, आर्थर रोड तुरुंगात संजय राऊत यांना भेटण्यास आलेल्या एक खासदार आणि दोन आमदारांना तुरुंग प्रशासनानं नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, पत्राचाळ प्रकरणात दाखल असलेल्या आरोपी संजय राऊत यांना भेटण्यासाठी राजकारण्यांना न्यायालयाचे आदेश किंवा परवानगी मिळाल्यावर त्यांची भेट होऊ शकते. आज खासदार आणि दोन आमदार आर्थर रोड जेलला आले आणि त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना राऊत यांची भेट घेण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र तुरुंग प्रशासनाने भेट नाकारली. (चित्रा वाघांनी शिवसेनेच्या वाघाला डिवचलं म्हणाल्या नितीश कुमार आणि उद्धव मार्ग..) तुरुंग नियमावलीनुसार, केवळ रक्ताच्या नात्यातील कुटुंबीयच त्यांना भेटू शकतात, तेही अभ्यागतांच्या खोलीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. (शिंदे गटातील शपथ घेतलेल्या 'या' तीन मंत्र्यांना भाजपचा होता विरोध; काय आहे कारण.) दरम्यान, गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडीत औषधं देण्याची परवानगी द्यावी आणि घरातील जेवण देण्याची मागणी करण्यात आली. राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने परवानगी द्यावी ही विनंती वकिलांनी केली असून आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना सूचना द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने संजय राऊत यांच्या वकिलांच्या मागण्या मान्य केल्या. पुढील २२ तारखेपर्यंत जेलमध्ये मुक्कामी राहावे लागणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या