मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shiv Sena Arvind Sawant : खासदार अरविंद सावंत पोलिसांना थेट म्हणाले तुमचीपण दादागिरी सुरू झाली का?

Shiv Sena Arvind Sawant : खासदार अरविंद सावंत पोलिसांना थेट म्हणाले तुमचीपण दादागिरी सुरू झाली का?

शिंदे गट आणि शिवसेनेचा वाद आता हातघाईवर जाऊन पोहोचला आहे. गणपती विसर्जनावरून शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडले. (Shiv Sena Arvind Sawant)

शिंदे गट आणि शिवसेनेचा वाद आता हातघाईवर जाऊन पोहोचला आहे. गणपती विसर्जनावरून शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडले. (Shiv Sena Arvind Sawant)

शिंदे गट आणि शिवसेनेचा वाद आता हातघाईवर जाऊन पोहोचला आहे. गणपती विसर्जनावरून शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडले. (Shiv Sena Arvind Sawant)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 11 सप्टेंबर : शिंदे गट आणि शिवसेनेचा वाद आता हातघाईवर जाऊन पोहोचला आहे. गणपती विसर्जनावरून शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडले. (Shiv Sena Arvind Sawant) याप्रकरणी पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान अरविंद सावंत आणि पोलिसांमध्येही किरकोळ वादावादी झाली. ते शिवसैनिकांची चौकशी करण्यासाठी आत जात असताना त्यांची गाडी अडवल्याने त्यांचा संताप अनावर झाला.

शिवसैनिकांना का अटक करण्यात आली, याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत रविवारी दादर पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिसांशी चर्चा करुन प्रतिक्रिया देईन, असे सांगितले. मात्र, हे संपूर्ण प्रकरण ज्या वाटेने जात आहे त्यावरून हा सगळा वाद आणखीन तापण्याची चिन्हे आहेत. दरम्यान यामध्ये सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत आमदार सदा सरवणकर यांनी मात्र आरोपांचे खंडण केले आहे.

हे ही वाचा : 'मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबदमधील सभेत येण्यासाठी लोकांना पैसे वाटलेत, कारण..'; अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

मुंबईत मागच्या कित्येक तासांपासून गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघत आहेत. दरम्यान यावेळी किरकोळ वादावादीचे प्रसंगही घडले परंतु शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने आल्याने या वादाचे रुपांतर मोठ्या स्वरुपात होण्याची शक्यता होती. प्रभादेवीमध्ये शुक्रवारी शिंदे विरुद्ध शिवसेना गटात जोरदार राडा झाला. बंडखोर आमदार सदा सरवणकर विसर्जन मिरवणुकीवेळी मनसेच्या स्वागत कमानीमध्ये दिसून आले होते. यावरून वातावरण तंग होते परंतु कोणताही वाद झाला नव्हता.

गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत वादावादी झाली होती. यावेळी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी माईकवरुन म्याव-म्यावचा आवाज काढत शिवसैनिकांना डिवचले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद तात्पुरता शमला होता.

हे ही वाचा : vinayak raut vs uday samant : उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करतात विनायक राऊतांनी सामंतांचा घेतला समाचार

मात्र, दादर पोलीस स्टेशनच्या परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने आले होते. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai police, Shiv Sena (Political Party), Shiv sena. शिवसेना