मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सांगितलं एक अन् केलं दुसरं.. शिंदे गटातील प्रवेश फसवणूक, मनसैनिकांच्या Video ने खळबळ

सांगितलं एक अन् केलं दुसरं.. शिंदे गटातील प्रवेश फसवणूक, मनसैनिकांच्या Video ने खळबळ

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पनवेल, उरण, खारघरमधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं वृत्त आलं होतं. मात्र, आता वेगळीच माहिती समोर आली आहे.

    पनवेल, 2 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल झाले आहे. यानंतर आता मनसेचे नेते सुद्धा शिंदे गटात दाखल झाल्याची बातमी काल माघ्यमांत झळकली होती. पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले असून माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी आमची फसवणूक झाल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. निवेदन द्यायचं आहे सांगून पक्षप्रवेश : मनसे काल सोमवारी पनवेलमधून महाराष्ट्र सैनिकांचा शिंदे गटात झालेला पक्ष प्रवेश ही निव्वळ फसवणूक असल्याचे समोर आले आहे. काल जवळपास 30 ते 40 कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे, असं सांगून फसवून तिथे नेण्यात आलं होतं. तिथे गेल्यावर त्यांना पक्ष प्रवेशाबाबत माहिती झाल्यावर त्यांनी स्पष्टपणे नकार दर्शवला होता. पण, दुर्दैवाने तोपर्यंत काही फोटो काढून झाले होते, असे काल प्रवेश केलेले मनसैनिक सांगत आहेत. आम्ही कालही राज ठाकरेंसोबत होतो, आजही राज साहेबांसोबत आहोत आणि उदयाही राज साहेबांसोबतच राहु असे काल माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्यासोबत गेलेले हे दोन मनसैनिक रवी पवार आणि  रोहित कोरडे हे सांगत आहेत. पक्षप्रवेशाच उत्तर लवकरच भव्य पक्ष प्रवेशानेच देणार असल्याचा इशारा शिंदे गटाला दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.त्यामुळे शिंदे गट आणि मनसेत वाद होणार हे स्पष्ट आहे. मनसेला मोठा झटका, वैभव खेडेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? काय आहे प्रकरण? शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे सरकारला महिना पूर्ण झाला आहे. पण अजूनही शिंदे गटामध्ये शिवसेचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी प्रवेशाचा धडाका लावला आहे. अशातच पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. अतुल भगत हे मागील 8 वर्षांपासून जिल्हा अध्यक्ष पदावर विराजमान होते. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  अतुल भगत यांच्यासह आजी माजी पदाधिकारी यांच्यासह एकूण 65 जणांनी घेतला शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती माध्यमात आली होती. मात्र, आता काही पदाधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, MNS

    पुढील बातम्या