मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : शाहू नगर, लेबर कॅम्प वार्डात मागच्या वेळी मनसेने मारली बाजी; यावेळी समीकरणं बदलणार काय?

BMC Election 2022 : शाहू नगर, लेबर कॅम्प वार्डात मागच्या वेळी मनसेने मारली बाजी; यावेळी समीकरणं बदलणार काय?

या वार्ड क्रमांक 189मध्ये शाहू नगर, हनुमान नगर, लेबर कॅम्प आदी भागांचा समावेश आहे.

या वार्ड क्रमांक 189मध्ये शाहू नगर, हनुमान नगर, लेबर कॅम्प आदी भागांचा समावेश आहे.

या वार्ड क्रमांक 189मध्ये शाहू नगर, हनुमान नगर, लेबर कॅम्प आदी भागांचा समावेश आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 30 जुलै : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 189चा (Ward no. 189) विचार केला तर याठिकाणी मनसेने (MNS) बाजी मारली होती. मनसेच्या उमेदवार हर्षला आशिष मोरे याठिकाणी निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 189 बाबत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. आरक्षण सोडतीत वार्ड क्रमांक 189 हा खुला ठेवण्यात आला आहे. या वार्ड क्रमांक 189मध्ये शाहू नगर, हनुमान नगर, लेबर कॅम्प आदी भागांचा समावेश आहे. 2017च्या निवडणुकीत मतदारांनी मनसेला पसंती दिली होती. यावेळी काय होतं, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 2017च्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आणि पक्ष -
  1. हर्षला आशिष मोरे - मनसे
  2. शामल सुरेश गंभीर - भाजप
  3. सुप्रिया दिलीप कटके - शिवसेना
  4. सीता दिपक वाघ - काँग्रेस
  5. मंगल विष्णू गायकवाड - अपक्ष
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. मनसे नगरसेवकाने केलेली कामे, तसेच त्यांनी लोकांशी ठेवलेला संपर्क यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 189मध्ये मतदार राजा आता पुन्हा मनसेला संधी देतात की, अन्य कुणा पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालतात, हे तर निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
First published:

Tags: BMC, Election, MNS, Mumbai

पुढील बातम्या