मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : साकीनाका वार्डात 2017ला मनसे विजयी, यावेळी समीकरणं बदलणार?

BMC Election 2022 : साकीनाका वार्डात 2017ला मनसे विजयी, यावेळी समीकरणं बदलणार?

वार्ड क्रमांक 163मध्ये साकीनाका (Sakinaka), काजूपाडा, इंदिरा नगर, परेरवाडी, मेफेअर इंडस्ट्रियल एरिया या भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 163मध्ये साकीनाका (Sakinaka), काजूपाडा, इंदिरा नगर, परेरवाडी, मेफेअर इंडस्ट्रियल एरिया या भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 163मध्ये साकीनाका (Sakinaka), काजूपाडा, इंदिरा नगर, परेरवाडी, मेफेअर इंडस्ट्रियल एरिया या भागांचा समावेश होतो.

    मुंबई, 27 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 163चा (Ward no. 163) विचार केला तर याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) बाजी मारली होती. मनसेचे उमेदवार दिलीप भाऊसाहेब लांडे हे याठिकाणी निवडून आले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 163 बद्दल. वार्ड क्रमांक 163मध्ये साकीनाका (Sakinaka), काजूपाडा, इंदिरा नगर, परेरवाडी, मेफेअर इंडस्ट्रियल एरिया या भागांचा समावेश होतो. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी मनसेचे उमेदवार दिलीप भाऊसाहेब लांडे निवडून आले होते. त्यांना 8009 मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष होता. काँग्रेस उमदेवार मोहम्मद शेख यांना 6234 मते मिळाली होती. 2017 साली झालेल्या निवडणुकीत या वार्डामध्ये एकूण 17405 मतदान झाले. या वार्डामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारापेक्षाही जास्त 264 इतके मतदान हे नोटाला झाले. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
    1. दिलीप भाऊसाहेब लांडे, मनसे - 8009
    2. मोहम्मद शेख, काँग्रेस - 6234
    3. महेंद्र साळुंखे, भाजप - 1889
    4. डॉ. केशरसिंग पाटील, शिवसेना - 756
    5. विलास मठकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 253
    6. नोटा - 264
    निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर मुख्य लढत ही मनसे आणि काँग्रेसमध्ये झाली. काँग्रेस उमेदवारावर मनसे उमेदवाराने विजय मिळवला होता. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मनसे उमेदवाराने मागील पाच वर्षात केलेली कामे, जनतेशी ठेवलेला संपर्क यावरही या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कोण जिंकणार ते स्पष्ट होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या