मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : साकी विहार, तुंगा गाव वार्डात जनता पुन्हा मनसेला संधी देणार का? काय असणार सत्ता समीकरणं?

BMC Election 2022 : साकी विहार, तुंगा गाव वार्डात जनता पुन्हा मनसेला संधी देणार का? काय असणार सत्ता समीकरणं?

वार्ड क्रमांक 156 मध्ये तुंगा गाव, उद्यान कॉम्प्लेक्स, सावरकर नगर, साकीविहार, एल अँड टी कंपनी हा महत्त्वाचा परिसर येतो.

वार्ड क्रमांक 156 मध्ये तुंगा गाव, उद्यान कॉम्प्लेक्स, सावरकर नगर, साकीविहार, एल अँड टी कंपनी हा महत्त्वाचा परिसर येतो.

वार्ड क्रमांक 156 मध्ये तुंगा गाव, उद्यान कॉम्प्लेक्स, सावरकर नगर, साकीविहार, एल अँड टी कंपनी हा महत्त्वाचा परिसर येतो.

    मुंबई, 10 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवातही केली आहे. वार्ड क्रमांक 156 साकी विहारचा (Ward no. Saki Vihar) विचार केला तर याठिकाणी मागच्या वेळी मनसेने (MNS) बाजी मारली होती. मनसेच्या उमेदवार अश्विनी माटेकर या याठिकाणी विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहा आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 156 बाबत. वार्ड क्रमांक 156 मध्ये तुंगा गाव, उद्यान कॉम्प्लेक्स, सावरकर नगर, साकी विहार, एल अँड टी कंपनी हा महत्त्वाचा परिसर येतो. गेल्या वेळी हा वार्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होता. यावेळीही हा वार्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीच आरक्षित झाला आहे. मागच्या निवडणुकीत मनसेच्या अश्विनी माटेकर यांनी याठिकाणी विजय मिळवला होता. त्यांना तब्बल 10992 इतकी मते याठिकाणी मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे - माटेकर अश्विनी अशोक महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 10992 पवार सविता शदर शिवसेना - 6500 नाडार जया सुंदर इंडियन नॅशनल काँग्रेस - 2077 तिवारी पुनम अविनाशचंद्र भारतीय जनता पार्टी 1754 भालेराव छाया भगवान, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी - 80 गायकवाड अनिता रमेश बहुजन समाज पार्टी - 195 खर्चन श्वेता केतन भारिप बहुजन महासंघ - 323 शेख शबनम अब्दुल मुख्तार भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ - 164 नोटाला - 195 एकूण 22280 हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबई महानगरपालिकेला देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानले जाते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लक्ष असते. यावेळी वार्ड क्रमांक 156मधील जनता पुन्हा मनसेच्या उमेदवाराला संधी देणार की दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्तांतराचा परिणाम होणार? नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यातील सत्तांतराचा या वार्डात काही परिणाम होतो का, हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या