मुंबई 24 ऑक्टोबर : नवी मुंबई शहरात आपलं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईत राज्य आणि देशभरातील लाखो नागरीक आपलं नशीब आजमवण्यासाठी येतात. या मुंबईत तुम्ही स्थिर स्थावर झाले असाल, आणि आपल्या डोक्यावर एका हक्काच्या छप्परचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता योग्य दरात नवी मुंबईत स्वत:चं हक्काचं घर विकत घेऊ शकता. कारण सिडकोकडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. सिडकोकडून ७ हजार ८४९ घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत दोन आहेत 'गेट वे ऑफ इंडिया', दुसऱ्याचा इतिहास माहिती आहे का? पाहा Video
या रूपात सिडकोनं दिवाळीनिमित्त नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. यात बामणडोंगरी आणि खारकोपरमधील घरांचा समावेश आहे. आजपासून तुम्ही घरांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. या घोषणेमुळे नवी मुंबईसारख्या शहरामध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आणि हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.
याआधी गणेशोत्सवात लॉटरी -
याआधी गणेश उत्साहाच्या मुहूर्तावर सिडकोने घरांसाठी सोडत जाहीर केली होती. सदनिका, व्यावसायिक गाळे आणि भूखंड अशी मेगा लॉटरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. यामध्ये 4158 घरं, 245 दुकानं आणि सहा मोठ्या भूखंडांचा देखील समावेश होता. त्याचवेळी यंदा दिवाळीत मुंबईमध्ये घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतला होता. यानंतर आता ही लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.
Diwali Shopping : मुंबईच्या 'या' मार्केटमध्ये अर्ध्या किंमतीमध्ये मिळतात महिलांचे ड्रेस, Video
दिवाळी सणाच्या काळातच ही सोडत जाहीर झाल्याने मुंबईत हक्काचं घर हवं असं वाटणाऱ्यांसाठी ही अतिशय खास दिवाळी भेट ठरणार आहे. त्यामुळे ज्या मुंबईकरांना स्वत:च्या हक्काचं घर घेवून श्रीगणेशा करायचा आहे, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mhada lottery