मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MCA Election : राजकीय विरोधक एकाच टीमसाठी करणार बॅटिंग, प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडं देशाचं लक्ष

MCA Election : राजकीय विरोधक एकाच टीमसाठी करणार बॅटिंग, प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडं देशाचं लक्ष

फाईल फोटो

फाईल फोटो

राजकारणात एकमेकांचे विरोधक असलेले अनेक दिग्गज नेते आज MCA निवडणुकीत मात्र एकाच टिममधून बॅटिंग करताना दिसणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 20 ऑक्टोबर : देशातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राजकारणात एकमेकांचे विरोधक असलेले अनेक दिग्गज नेते आज MCA निवडणुकीत मात्र एकाच टिममधून बॅटिंग करताना दिसणार आहेत. कालच वानखेडे स्टेडियम येथील MCA सभागृहात झालेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या बैठकीनंतरही पडद्यामागून अनेक राजकिय खेळी सुरू असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्ष, आता तुमचा रोल काय? राहुल गांधी म्हणतात...

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारमधून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी बैठक संपल्यावर वानखेडे स्टेडियम ते सिल्वर ओक असा प्रवास केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. या प्रवासादरम्यान आज होणाऱ्या मतदानाच्या रणनितीची चर्चा झाल्याची माहीती मिळत आहे. सर्वाधिक मतदान होण्यासाठी सर्वच उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसून येतं.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे MCA चे मतदार आहेत. त्यामुळे आज मतदानाला हे तिन्ही ठाकरे येणार असल्याची माहीती मिळत आहे. MCA निवडणुकीसाठी आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर रात्री 8 पर्यंत निकाल जाहीर होणार आहे.

'तीन महिन्यांपूर्वी आम्हीही बॅटिंग केली, काहींचा अप्रत्यक्ष आशिर्वाद,' पवारांसमोर काय बोलले एकनाथ शिंदे?

अध्यक्षपदासोबत कार्यकारी मंडळाच्या जागांसाठीही थेट लढत आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार असणार आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येऊन पवार-शेलार गटातून ही निवडणूक लढवत आहेत. सहसचिवपदासाठी दीपक पाटील यांच्याविरुद्ध कोणीही उमेदवारी अर्ज केलेला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. तर, अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळेल.

First published:

Tags: Ashish shelar, Cricket news, Sharad Pawar