मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत मोबाईल अन् दागिन्यांची चोरी; गणेशभक्तांच्या पोलीस ठाण्याबाहेर रांगा

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत मोबाईल अन् दागिन्यांची चोरी; गणेशभक्तांच्या पोलीस ठाण्याबाहेर रांगा

गर्दीचा फायदा उचलत चोरांनी चांगली हातसफाई केली. लालबागच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी चोरट्यांनी जवळजवळ 50 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि वस्तू चोरल्याचं समोर आलं आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 10 सप्टेंबर : मुंबईच्या लालबागच्या राजाचं थाटामाटात विसर्जन करण्यात आलं आहे. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. अत्यंत थाटामाटात लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी राज्यात थाटामाटात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. त्यामुळे लागलबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. याचाच फायदा चोरट्यांनी उचलला आणि मिरवणुकीत चोरीच्या अनेक घटना घडल्या.

पोलिसांची कमाल: PUC सर्टिफिकेट नाही म्हणून चक्क इलेक्ट्रिक स्कूटरचालकाला दंड!

गर्दीचा फायदा उचलत चोरांनी चांगली हातसफाई केली. लालबागच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी चोरट्यांनी जवळजवळ 50 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि वस्तू चोरल्याचं समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे ही फक्त काळा चौकीतील परिस्थिती आहे. गिरगांव चौपाटी, दादर आणि जुहू भागातही चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

लालबागच्या राज्याच्या विसर्जनाच्या गर्दीत चोरांच्या टोळ्यांनी अक्षरशः हैदोस घातला. या गर्दीत अनेक मोबाईल, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र चोरट्यांनी लुटले. सुमारे 50 मोबाईल फोन आणि सोनसाखळी चोरीच्या तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत. चोरीची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात लोकांची रांग लागली आहे.

अजब सरकारी कारभार! पूर्वजांनी 68 वर्षांपूर्वी प्यायलेल्या पाण्याची पतवंडांकडून वसुली

मोबाईल हरवल्याची तक्रार आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात पोलीस व्यस्त आहेत. लालबागचा राजा काळी चौकी या भागातून जात असताना याठिकाणी मोठी गर्दी होती. यादरम्यानच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी गणेशभक्तांना लुटलं. त्यामुळे, मिरवणुकीवेळी गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे. या घटनांमुळे आता पोलिसांचं कामही वाढलं आहे.

First published:

Tags: Mumbai News, Theft