मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भोसरी जमीन घोटाळा प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नींना मोठा दिलासा, कोर्टाने निर्णय ठेवला कायम

भोसरी जमीन घोटाळा प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नींना मोठा दिलासा, कोर्टाने निर्णय ठेवला कायम

या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे.

मुंबई, 19 एप्रिल : भोसरी भूखंड कथित घोटाळा प्रकरणी (Pune land case) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी एकनाथ खडसे (Mandakini Khadses) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणी अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.

पुणे भूखंड कथित घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. तसंच कोर्टात सुनावणी सुद्ध सुरू आहे.  पुणे एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मंदाकिनी खडसे यांच्या अटक पूर्व जामिनावर आज सुनावणी पार पडली.  मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली.

(कंटेनरची रिक्षाला जबर धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू, बुलडाण्यातील घटना)

या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे.  मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आधीच दिलासा मिळाला होता.

(..अन् विमानातच ढसाढसा रडू लागली एअर होस्टेस; VIDEO पाहून भावुक झाले लोक)

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अटकेची शक्यता होती. मात्र, मंदाकिनी खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  त्यांनी या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांचाही जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणात पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी ठेवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.

First published: