मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंबानींना धमकी देण्यासाठी 8 वेळा केला कॉल; वारंवार ही 2 वाक्यं बोलत होता 'अफजल'

अंबानींना धमकी देण्यासाठी 8 वेळा केला कॉल; वारंवार ही 2 वाक्यं बोलत होता 'अफजल'

पुढील तीन तासात अंबानी कुटुंबाला जीवे मारणार असल्याची धमकी या माथेफिरूने दिली. त्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल येथे धमकीचे 7 ते 8 कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. (Threat to Mukesh Ambani)

    मुंबई 15 ऑगस्ट : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुढील तीन तासात अंबानी कुटुंबाला जीवे मारणार असल्याची धमकी या माथेफिरूने दिली. त्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल येथे धमकीचे 7 ते 8 कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये फोन करून सांगितलं, की तो नंबर एकचा दहशतवादी आहे आणि तो मुकेश अंबानींना जीवे मारणार आहे. तो एनआयए, एटीएस, मुंबई पोलिसांनाही आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करत होता. यासोबतच तो म्हणत होता, की तो या सगळ्यांनाही दाखवून देईल. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. BREAKING : मुकेश अंबानींच्या कुटुंबाला धमकीचे फोन, पुढील 3 तासांत जीवे मारण्याची धमकी सूत्रांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये एक-दोन नाही, तर तब्बल 8 वेळा कॉल केले. पोलीस सध्या हा कॉल व्हेरिफाय केला जात आहे. कॉल करणारा व्यक्ती आपलं नाव अफजल असल्याचं सांगत आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी आज सकाळी देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना दिसले होते. त्यांचा व्हिडिओही समोर आला होता. त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे. कॉल करणारा हा व्यक्ती कोण आहे आणि तो हे सगळं कशासाठी करत आहे, याबद्दलची माहिती पोलीस तपासानंतरच समोर येऊ शकेल. सध्या पोलिसांनी याप्रकरणी तातडीनं तपासाला सुरुवात केली आहे. धमकीचे कॉल आलेला नंबर ट्रेस केला जात आहे. मुंबई पोलिसांची एक टीम आता अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटेलिया परिसरात पोहोचली आहे. या परिसरात पोलिसांकडून पाहणी केली जात आहे. vinayak mete : विनायक मेटेंच्या अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रकचा VIDEO अखेर समोर मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च भाषा वापरणे याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरील व्यक्ती हा वारंवार एकच बोलत होता, मी अंबानी कुटुंबीयांना मारणार आहे, त्यांना मरावेच लागणार आहे, असं तो फोनवर बोलत होता. पोलिसांनी हे फोन कॉल रेकॉर्ड ऐकले आहे. त्यावरून हा व्यक्ती माथेफिरू असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Mukesh ambani

    पुढील बातम्या