मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दरेकर संतापले म्हणाले, "बँका तुम्ही लुटायच्या आणि गुन्हे आमच्यावर दाखल करायचे, जरंडेश्वर कारखान्याचे मारेकरी कोण हे सांगणार"

दरेकर संतापले म्हणाले, "बँका तुम्ही लुटायच्या आणि गुन्हे आमच्यावर दाखल करायचे, जरंडेश्वर कारखान्याचे मारेकरी कोण हे सांगणार"

Pravin Darekar in Vidhan Parishad: प्रवीण दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. या प्रकरणात तक्रार दाखल होताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई, 22 मार्च : दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर (Mumbai Bank) अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी आज प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षावर चांगलाच हल्लाबोल केला.

अमित शहांकडे तक्रार करणार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, भंडारा, राष्ट्रवादी काँग्रेस लेबर फेडरेशनचा अध्यक्ष त्याच्यावर कारवाई नाही, त्याच्यावर गुन्हा नाही. त्याला वेगळा कायदा. कैलास नगीने, भुसाळकर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस, श्री भोयर गडचिरोली काँग्रेस, श्री साठे सांगली राष्ट्रवादी काँग्रेस, प्रमोद झांबरे सातारा राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण नरावणे, उस्मानाबाद काँग्रेस, मोरेश्वर वर्धा काँग्रेस, श्री तनवीर अमरावती काँग्रेस, श्री बंटी शिरसाट बीड राष्ट्रवादी काँग्रेस लेबर फेडरेशनचे अध्यक्ष, हे गरीब मजूर. माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला, कारवाई सुरू आहे. तर हे कोण आहेत या संदर्भात आपल्यामाध्यमातून राज्यातील जनतेसमोर आणत आहे.

मला वाटतं सभापती या व्यतिरिक्त 130 आजी -माजी आमदारांची यादी आहे. या सर्वांची यादी मी वाचून दाखवत नाही पण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. प्रश्न माझ्या विरोधातील कारवाईचा नाहीये. प्रवीण दरेकर विरोधात कारवाई झाली, नाहीतर सांगून टाकू कारवाई फक्त दरेकरांच्या विरोधात होती असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

सहकार विभागाने,सीएमओनं अधिका-यांवर दबाव टाकून माझ्याविरोधात कारवाई केली जात आहे. विरोधी पक्षनेत्यांना चिरडून टाकण्याचे काम केले जातंय. यासंदर्भात मी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांकडे तक्रार देणार आहे असंही दरेकर म्हणाले.

फळं येणाऱ्या झाडालाच लोक दगड मारतात

प्रवीण दरेकर म्हणाले, या ठिकाणी सहकार चळवळीवर दरोडे यांनी टाकायचे, चोऱ्या करायच्या आणि... माझ्यावर काय आरोप केला तर मजूर संस्थांच्या माध्यमातून 22300 रुपये भत्ता घेतला. मी मोठा दरोडेखोर... ठीक आहे फळं येणाऱ्या झाडालाच लोक दगड मारत असतात.

वाचा : मुंबै बँक: प्रवीण दरेकर यांच्याविरोधात बोगस मजूर प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

साखर कारखानदारी या महाराष्ट्राचं वैभव आहे. हे कसं या पुढाऱ्यांनी वाटोळं केलं आहे. हे मुद्द्यासह मांडणार आहे. ती एक म्हण आहे ना की, राजाने बिडी प्यायली तर ती स्टाईल आणि गरिबाने प्यायली तर तो भिकारी अशा मनोवृत्तीत हे राज्य सरकार काम करत आहे असंही दरेकर म्हणाले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा घोटाळा मी या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. आजपर्यंतचा देशातील सर्वात सुनियोजित घोटाळा कुठला असेल तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा आहे. बरं हे कुणी केलं? इथं करोडो रुपयांचे डल्ले मारले आहेत. अपुऱ्या तारणमुल्य असलेल्या संस्थांना कर्जपुरवठा केला. सुरेश धस यांना तारण घेऊन कर्ज दिलं, नियमित कर्जफेड होत आहे. पण सुरेश धस तीन नगरपरिषदेवर झेंडा फडकवतात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

वाचा : ST विलीनीकरणाबाबत सरकारने मागितली 15 दिवसांची मुदत, कोर्टाने सदावर्तेंना झापलं!

दरेकर पुढे म्हणाले, जरंडेश्वर कारख्यान्याचे खरे मारेकरी कोण हे मी सांगणार आहे. आधी सहकारी बॅंकेकडून अव्वासव्वी कर्ज काढायचे आणि नंतर ते कारखाने लिलावात काढायचे. मग कालांतराने कारखान्याची विक्री खाजगी संस्थेला करायचे. यावर एखादा चित्रपट निघेल. जरंडेश्वरवर कितीचे कर्ज होते तर फक्त 19 कोटीचे. इतकी मदत केली जावू शकले असते. पण तसे झाले नाही. निविदा काढली तेव्हा 12 जणांनी भाग घेतला. त्यानंतर 2-3 वेळा निविदा काढली. आणि नंतर गुरू कमोडीटीला विकली गेली. आता एफआयआरमध्ये 67 मोठ्या लोकांची नावे आहेत. पोलीस उपायुक्तांने या सर्वांना क्लीनचीट दिली. पुणे जिल्हा बॅंकेने 10 वर्षात जरंडेश्वरला 700 कोटी रूपये कर्ज दिले.

First published:

Tags: Budget, Maharashtra Budget, Pravin darekar