मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : 'खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत...; विरोधकांच्या या 8 घोषणांनी गाजवला आजचा दिवस

Video : 'खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत...; विरोधकांच्या या 8 घोषणांनी गाजवला आजचा दिवस

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घोषणांची दखल घेत धनंजय मुंडेवर फटकेबाजी केली.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घोषणांची दखल घेत धनंजय मुंडेवर फटकेबाजी केली.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घोषणांची दखल घेत धनंजय मुंडेवर फटकेबाजी केली.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 22 ऑगस्ट : पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Monsoon Session) मुख्यमंत्र्याच्या निर्णयाबरोबरच विरोधकांच्या घोषणांनी विरोधकांचं लक्ष वेधलं आहे. इतकच काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घोषणांची दखल घेत धनंजय मुंडेवर फटकेबाजी केली. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (chagan bhujba) यांनी पालघरमधील आरोग्य सुविधेच्या मुद्यावर आतापर्यंत किती डास पकडले असा मिश्किल सवाल केला, त्यावर सावंत यांनीही उत्तर दिले, त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकला.

विरोधकांच्या हिट ठरलेल्या घोषणा...

-खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके...माजलेत बोके

-आले रे आले..गद्दार आले

-शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..

-गद्दारांचं सरकार, हाय हाय

-50 खोके, एकदम ओक्के...

-ईडी ज्यांच्या घरी, तो भाजपच्या दारी...

-‘पन्नाsssस खोके,पन्नास खोके.. खावून खावून माजले गद्दार बोके

-सुधीरभाऊंना चांगला खातं न देणाऱ्या सरकारचा धिक्कास असो...

" isDesktop="true" id="750235" >

विधानसभेच्या बाहेर विरोधकांनी आपल्या घोषणांनी दिवस गाजवला. तर एकनाथ शिंदेही मागे राहिले नाही. फडणवीस मी साथ-साथ, मेरा भी नाव एकनाथ, असं म्हणत त्यांनी आपल्या निर्णयामागे कोणी नसल्याचं सांगितलं.

BREAKING : आता नगराध्यक्ष जनतेतूनच निवडणार, शिंदेंची जोरदार बॅटिंग, विधेयक मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नगराध्यक्ष निवड व्हावी यासंदर्भातील विधेयकावर विधानसभेत(Maharashtra Assembly Monsoon Session) प्रस्ताव मांडला होता. पण नगराध्यक्षांची निवड ही जनतेून होईल, यासाठी विरोधकांनी कडाडून विरोध केला. पण, शिंदे यांनी जोरदार भूमिका मांडली.

First published:

Tags: NCP, Vidhan sabha