मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वाहतूक कोंडींमुळे नागरिकांचे हाल; खेरवाडी ते वाकोला पुलादरम्यान मोठी गर्दी, पाहा Latest Update

वाहतूक कोंडींमुळे नागरिकांचे हाल; खेरवाडी ते वाकोला पुलादरम्यान मोठी गर्दी, पाहा Latest Update

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सायंकाळी घराबाहेर पडण्याचा प्लान असेल तर हे रस्ते टाळा...पाहा अपडेट...

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 12 ऑगस्ट : मोठ-मोठे खड्डे, तुफान पाऊस, अनेक ठिकाणी रस्त्यांची वा मेट्रोची कामं यामुळे मुंबई आणि उपनगरात प्रवास करताना नागरिकांची तारांबळ उडते. त्यात एखादा सण-उत्सव किंवा लागून सुट्ट्या आल्या तर मग विचारायची सोय नाही. अशावेळी कुठे फिरायला जायंच म्हणजे वाहतूक कोंडीत अडकण्याची गॅरेंटीच आहे. दरम्यान सायंकाळच्या वेळेस मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होते. खराब रस्त्यांमुळे वाकोला पूल, बांद्रा रेल्वे पूल, खेरवाडी येथे उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक संथ गतीने चालू आहे. Video : मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 5 ते 6 किमी लांब रांगाच रांगा वाकोला पूल, टीचर कॉलनी येथे उत्तरेकडे जाणाऱ्या दिशेलाही मोठी वाहतूक कोंडी आहे. दुसरीकडे लिला हॉटेल अंधेरी कुर्ला रस्त्यावर दक्षिण व उत्तरेकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. ठाणे ते डोंबिवली मार्गावरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काल राखीपौर्णिमेलाही मुंबई-नाशिक महामार्गावर 5 ते 6 किलोमीटर इतक्या वाहनांच्या रांगा होत्या. त्यानंतर 14, 15, 16 ऑगस्ट रोजी सुट्ट्या असल्या कारणाने अनेक जणं बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतील. मात्र यापूर्वी वाहतुकीच्या अपडेटकडे लक्ष द्या.

First published:

Tags: Mumbai, Traffic, Traffic police

पुढील बातम्या