मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kedar Dighe vs Eknath Shinde : आनंद दिघेंचा पुतण्या केदार दिघेंनी बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होत मुख्यमंत्री शिंदेच्या विरोधात कसली कंबर

Kedar Dighe vs Eknath Shinde : आनंद दिघेंचा पुतण्या केदार दिघेंनी बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होत मुख्यमंत्री शिंदेच्या विरोधात कसली कंबर

मागच्या दिडमहिन्यांपासून राज्याच्या राजकारणात उलथापालथ पहायला मिळत आहे. शिवसेनेतील 41 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. (Kedar Dighe vs Eknath Shinde)

मागच्या दिडमहिन्यांपासून राज्याच्या राजकारणात उलथापालथ पहायला मिळत आहे. शिवसेनेतील 41 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. (Kedar Dighe vs Eknath Shinde)

मागच्या दिडमहिन्यांपासून राज्याच्या राजकारणात उलथापालथ पहायला मिळत आहे. शिवसेनेतील 41 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. (Kedar Dighe vs Eknath Shinde)

  मुंबई, 09 ऑगस्ट : मागच्या दिड महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात उलथापालथ पहायला मिळत आहे. शिवसेनेतील 41 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. (Kedar Dighe vs Eknath Shinde) दरम्यान बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या सगळ्यात ठाणे जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत शिवसेनेने नवीन नियुक्त्या केल्या यामध्ये केदार दिघे यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

  केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात जोरदार उतरणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. केदार दिघे यांची मागच्या दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, यानंतर त्यांनी  शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ येथे नतमस्तक होऊन नवीन कार्यास सुरवात केली त्यांनी ट्वीटरवर फोटो शेअर केला आहे.

  हे ही वाचा : Cabinet Expansion :अब्दुल सत्तार, संजय राठोड होणार मंत्री? एकूण 18 जणांचा शपथविधी, संपूर्ण यादी

  दरम्यान आज (दि.09) मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आणि दुसरीकडे केदार दिघे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला नतमस्तक होत कार्याला सुरूवात केली. यामुळे केदार दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कितपत आव्हान देतात हा येणारा काळ ठरवणार आहे. परंतु ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी देण्यासाठी दिघे काम करणार असल्याचे बोलेल जात आहे. त्यांच्या सोबत शिवसेना खासदार राजन विचारे देखील आहे. राजन विचारे हे आनंद दिघेंच्या सर्वात जवळचे असल्याचे बोलले जायचे.

  केदार दिघेंवर बलात्काराचा गुन्हा

  शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांच्या विरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार पीडित महिलेला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र रोहित कपूरने सेंट रेजीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका कर्मचारी युवतीवर बलात्कार झाल्याची तक्रार एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात मंगळवारी नोंदवण्यात आली होती.

  हे ही वाचा : Weather Forecast: कुठे रेड, तर कुठे ऑरेंज अलर्ट; मुंबई पुण्यासह याठिकाणी आजही मुसळधार पाऊस

  केदार दिघेंना जाणीव पूर्वक टाळले

  ठाण्यातील शिवसेनेचे काही नेते त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवत होते हे लक्षात आल्याने चार वर्षांपूर्वी त्यांनी युवासेनेचा राजीनामा दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करताच केदार दिघे राजकारणात सक्रिय झाले. ते शिवसेना भवनात वेळोवेळी दिसू लागले. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी काढलेल्या शिवसंवाद यात्रेत केदार दिघे आपल्या समर्थकांसह सहभागी झाले होते.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Thane (City/Town/Village), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या