मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राष्ट्रवादीतून मोठी बातमी, महत्त्वाचा नेता नाराज, शरद पवार अजितदादांसोबत घेणार बैठक?

राष्ट्रवादीतून मोठी बातमी, महत्त्वाचा नेता नाराज, शरद पवार अजितदादांसोबत घेणार बैठक?

सत्तेवरून पायउत्तार झाल्यानंतर राष्ट्रवादीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.

सत्तेवरून पायउत्तार झाल्यानंतर राष्ट्रवादीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.

सत्तेवरून पायउत्तार झाल्यानंतर राष्ट्रवादीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 08 ऑगस्ट : सत्तेवरून पायउत्तार झाल्यानंतर राष्ट्रवादीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड न झाल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज होते. आता त्यांची नाराजीही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यापर्यंत पोहोचली आहे. लवकरच शरद पवार हे अजित पवार (ajit pawar) आणि जयंत पाटलांना (jayant patil) सोबत बसवून चर्चा करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीकडे आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद गेले. यावेळी विरोधी पक्षनेतेपदी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा होती. पण, अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदी निवड न केल्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा रंगली होती. (शिवसेनेपाठोपाठ आणखी एक मित्र पक्ष देणार भाजपला धक्का; या राज्यातील सरकार कोसळणार) आता जयंत पाटील यांची नाराजी शरद पवारांपर्यंत पोहचली. अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्षनेते केल्याने जयंत पाटील नाराज आहे. शरद पवार लवकरच दोन्हीं नेत्यांची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नियुक्तीला आमदाराचे पत्र ही उशिरा दिल्याने ही नाराजी उघड झाली होती. जयंत पाटील का झाले नाराज? जयंत पाटील हे राष्ट्रवादीमधल्या अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. सत्तेत असताना जयंत पाटील यांनी गृह, वित्त, ग्रामीण विकास यासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदं सांभाळली. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळाचे गटनेतेही आहेत. जयंत पाटील यांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केल्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं नाही. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना दोनदा फोन करून 53 पैकी 36 आमदारांनी स्वाक्षरी करून अजित पवारांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे, अशी आठवण करून दिली. (पुणे हादरलं! आधी घरात घुसून बलात्कार, मग अपहरण करून मुंबईला नेलं अन्..) अजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदासाठी पाठिंबा देणारे पत्र मागण्यासाठी धनंजय मुंडे जयंत पाटील यांच्याकडे गेले होते. तेव्हा आपण थोड्याच वेळात पत्र देऊ असे पाटील म्हणाले परंतु त्यांनी पत्र दिले नाही. अखेर प्रफुल पटेल यांना जयंत पाटलांना दोन वेळा फोन करावा लागला, अशी माहिती समोर आली.
First published:

पुढील बातम्या