मुंबई, 20 ऑगस्ट : दहीहंडी फोडली म्हणून उल्हासनगरमध्ये भोला वाघमारे या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मात्र भोलाने बक्षीस मिळावे म्हणून हंडी फोडल्याचे सांगत बक्षीसासाठी विनंती केली आहे.
उल्हासनगरमध्ये शिंदे गटाच्या अरुण आशान यांच्या जय भवानी मित्र मंडळाच्या दहीहंडीत ८० फुटावर दोरीला लटकून भोला वाघमारे या तरुणाने दहीहंडी फोडली. यानंतर मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांनी भोलाला ताब्यात घेत अटक केली. दारू पिऊन भोलाने हंडी फोडली म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली.
वरळीतील दहीहांडीवरून सेना-भाजपमध्ये जुंपणार; BMC चा 2 कोटी खर्च पाण्यात?
भोलाला आज उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले असता त्याची पर्सनल बॉण्डवर सुटका करण्यात आली. दरम्यान हंडीचे ५५ हजार ५५५ रुपयांच्या बक्षीसाचा मी हक्कदार असल्याचे भोलाचे म्हणणे आहे, तसे त्याचा वकील सुमित गेमनानी याने न्यायालयात सांगितले. आयोजकांनी ही दहीहंडी फोडण्याचं आवाहन केलं होतं. त्यात मनोरे रचून हंडी फोडावी असा कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे भोलाने हंडी फोडली. आता त्याला आयोजकांना बक्षीस देण्यासाठी नोटीस पाठवायची असेल तर तो वकिला मार्फत पाठवू शकतो. शिवाय भोलाने दारू पिऊन हंडी फोडली म्हणून ज्या कलमा खाली त्याला अटक झाली हे पोलिसांना न्यायालयात सिद्ध करता आले नाही, असे देखील वकील गेमनानी यांनी सांगितले.
त्यामुळे हंडी वरून सुरू झालेल्या हा सगळया गोंधळानंतर हंडी फोडण्याचे बक्षीस पोलिसांनी अटक केलेल्या भोलाला मिळेल का हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ulhasnagar