मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : नागरी निवारा, संतोष नगर वार्डात मागच्या वेळी अपक्ष उमेदवाराला लॉटरी, यावेळी समीकरणं बदलणार का?

BMC Election 2022 : नागरी निवारा, संतोष नगर वार्डात मागच्या वेळी अपक्ष उमेदवाराला लॉटरी, यावेळी समीकरणं बदलणार का?

मुंबईतील वार्ड क्रमांक 41मध्ये नागरी निवारा, संतोष नगर, इंदिरा नगर डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट, संकल्प कॉलनी आणि नॅशनल पार्क या भागांचा समावेश होतो.

मुंबईतील वार्ड क्रमांक 41मध्ये नागरी निवारा, संतोष नगर, इंदिरा नगर डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट, संकल्प कॉलनी आणि नॅशनल पार्क या भागांचा समावेश होतो.

मुंबईतील वार्ड क्रमांक 41मध्ये नागरी निवारा, संतोष नगर, इंदिरा नगर डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट, संकल्प कॉलनी आणि नॅशनल पार्क या भागांचा समावेश होतो.

  मुंबई, 12 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 41 मध्ये (Ward no. 41) मागच्या वेळी अपक्ष उमेदवाराने (Independant) बाजी मारली होती. अपक्ष उमेदवार तुळशीराम शिंदे याठिकाणी विजयी झाले होते. मुंबई महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 41 बाबत. मुंबईतील वार्ड क्रमांक 41मध्ये नागरी निवारा, संतोष नगर, इंदिरा नगर डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट, संकल्प कॉलनी आणि नॅशनल पार्क या भागांचा समावेश होतो. मागच्या वेळी याठिकाणी जो निकाल लागला त्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला. याठिकाणी अपक्ष उमेदवार तुळशीराम शिंदे यांचा विजय झाला होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -  तुळशीराम शिंदे, अपक्ष - 6217 सदाशिव पाटील, शिवसेना - 3869 अर्चना देसाई, भाजप - 2975 अन्वर पीर सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 1858 जुली पटेल, सपा - 1055 जयकांत शुक्ला, काँग्रेस - 631 रघुनाथ कोठारी, अपक्ष - 746 शेख अब्दुल वहाब फय्याज अली, एमआयएम - 173 मंगेश पवार, बहुजन मुक्ती पार्टी - 55 अजय सावंत, मनसे - 600 नजीर शेखर, भारतवादी एकता पार्टी - 23 यादव लालमणी, अपक्ष - 83 सचिन घोलप, अपक्ष - 131 शामराव हिवाळे, भारिप - 309 दत्तात्रय कराडकर, संभाजी ब्रिगेड - 34 सचिन केळकर, अपक्ष - 584 रिजयान खान, बसपा - 136 परेश मोरे, अपक्ष - 58 नोटा - 154 2017च्या निवडणुकीत याठिकाणी एकूण 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात सहा अपक्षांचा समावेश आहे. मतदानाची आकडेवारी पाहिली तर प्रमुख पक्षांना मात देत याठिकाणी अपक्ष उमदेवार तुळशीराम शिंदे हे निवडून आले. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला महापौरपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे अपक्षांच्या साथीने शिवसेनेने महापालिकेत महापौर बसवला होता. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका
  वार्ड क्रमांक 43मधील मतदारांची संख्या ही 57495 इतकी आहे. त्यात अनुसूचित जाती 2879 तर, अनुसूचित जमातीचे 409 इतके नागरिक आहे. मागच्या निवडणुकीत याठिकाणी फक्त 18791 मतदारांनी मतदान केले होते.
  राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो, तसेच वार्ड क्रमांक 43मधील जनता यावेळी कुणाच्या पारड्यात जास्त मते टाकून त्या उमदेवाराला विजयी करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BMC, Election, Mumbai

  पुढील बातम्या