मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तर त्याला दाखवून द्या', उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश

'...तर त्याला दाखवून द्या', उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश


'मी कोणालाही कमी लेखत नाही. आपल्याला जिंकायचे आहे. मर्दासारखे जिंकायचे आहे.

'मी कोणालाही कमी लेखत नाही. आपल्याला जिंकायचे आहे. मर्दासारखे जिंकायचे आहे.

'मी कोणालाही कमी लेखत नाही. आपल्याला जिंकायचे आहे. मर्दासारखे जिंकायचे आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 08 ऑगस्ट : 'शिवसेनेचा भगवा कोणाला हिसकू देऊ नका. भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या' असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांनी शिवसैनिकांना आदेश दिले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसैनिकांनी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नवा आदेश दिला. आपली ताकत वाढली आहे. या ताकदीने नाशिकमध्ये 1 लाखापेक्षा अधिक सदस्य नोंद झाली पाहिजे. माझा भरवसा तुमच्यावर आहेत. माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरे कुणीही नाही. त्यांनी ( एकनाथ शिंदे गट) सदस्य नोंदणीसाठी प्रोफेशनल एजेंट लावले आहेत. सदस्य संख्या ते जेवढी करत आहेत त्याच्या दसपटीने मला हवी आहे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांकडे केली आहे. (Aadhar Cardमध्ये किती वेळा बदल करता येतात? नाव, पत्ता बदलाबाबत नियम समजून घ्या) केवळ गर्दी,फोटो नको. फोटो घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो तर तुमचे सदस्य दाखवा असे ते म्हणतील. त्यामुळे ते आपल्याला घरी परत पाठवून देतील. त्यांच्या एजन्सी काम करत आहेत. त्यामुळे आपल्याला सदस्यांची संख्या ही दसपटीने जास्त असायला हवी आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. (आलियाच्या पोटी जन्म घेणार ऋषी कपूर? अभिनेत्रीची डिलिव्हरी डेट आली समोर) 'मी कोणालाही कमी लेखत नाही. आपल्याला जिंकायचे आहे. मर्दासारखे जिंकायचे आहे. प्रतिज्ञा पत्र एवढी झाली पाहिजे की भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. सगळ्यांना वेळेवर जबाबदारी नक्की देईल. शिवसेनेचा भगवा कोणाला हिसकू देऊ नका. भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला त्याला दाखवून द्या, असा आदेशही उद्धव ठाकरेंनी दिला.
First published:

पुढील बातम्या