मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंच्या वरळीत 'सर्जिकल स्ट्राईक', शेकडो कोळी बांधव वर्षा बंगल्यावर!

एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंच्या वरळीत 'सर्जिकल स्ट्राईक', शेकडो कोळी बांधव वर्षा बंगल्यावर!

मोठ्या संख्येनं कोळी बांधव जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाहेर येऊन कोळी बांधवांशी संवाद साधला

मोठ्या संख्येनं कोळी बांधव जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाहेर येऊन कोळी बांधवांशी संवाद साधला

मोठ्या संख्येनं कोळी बांधव जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाहेर येऊन कोळी बांधवांशी संवाद साधला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 02 ऑक्टोबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे अनेक आमदार आणि खासदारांनी शिंदे गटात जाहीरपणे प्रवेश केला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. वरळी मतदारसंघामध्ये 500 कोळी बांधव शिंदे गटात सामील झाले आहे.

वरळी मतदारसंघातील कोळीवाडा येथील जवळपास 500 कोळी बांधव आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले. मोठ्या संख्येनं कोळी बांधव जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाहेर येऊन कोळी बांधवांशी संवाद साधला. कोळी बांधवांनी वेगवेगळ्या समस्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. यावेळी कोळी बांधवांनी मुख्यमंत्र्यांचा कोळी टोपी देऊन सत्कार केला.

(ठाकरे- शिंदे वादाची ठिणगी गोकुळ दूध संघात, मुरलीधर जाधव यांचे संचालकपद रद्द)

हे सरकार तुमच्यासोबत आहे. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही इथं आहोत. एकविरा आई मंदिराला देवीला मोठा निधी देण्यात आला आहे. मी तुमच्या मधलाच कार्यकर्ता आहे, असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यावेळी काही शिक्षक संघटनेनंही मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिलं. यावेळी, 'आपण बाकीचे प्रश्न सुद्धा लवकर सोडवूया. शिक्षकांचे प्रश्न सोडवाचे आहेत तुम्ही काळजी करू नका. शिक्षकांचे विषय आहेत ते आपण एकदा बैठक घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ' असं आश्वासन शिंदे यांनी दिलं.

 4 आमदार आणि 3 खासदार लवकरच शिंदे गटात?

दरम्यान, शिवसेना फुटल्यामुळे आमदारांची गळती लागली आहे. शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरूच आहे. अशातच बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी खळबळजनक दावा केला आहे.

( गुलाबराव पाटलांच्या मनातली खदखद अखेर आली बाहेर, चांगल्या खात्याचा मोह आवरेना)

शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी 4 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून 3 खासदार देखील लवकरच शिंदे गटात सामील होणार आहेत. त्यात एक मुंबईचे खासदार असतील असा दावा जाधव यांनी केला आहे.

तसंच, मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात येणार असल्याचे बोलल्या जात असताना त्याला खासदार जाधव यांनी दुजोरा दिला आहे. नार्वेकरच नव्हे तर 3 खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचे जाधव म्हणाले.

First published:

Tags: Marathi news