मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संजय राऊत सुटले, नवाब मलिकांचं काय? आता 30 तारखेला येणार फैसला

संजय राऊत सुटले, नवाब मलिकांचं काय? आता 30 तारखेला येणार फैसला

 
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात सुनावणी झाली.

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात सुनावणी झाली.

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात सुनावणी झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 नोव्हेंबर : गोवावाला कंपाउंड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची जामिनासाठी धावाधाव सुरूच आहे. आता नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर 30 नोव्हेंबरला कोर्ट निकाल देणार आहे. त्यामुळे मलिक यांना जेल मिळणार की बेल मिळणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने मलिक यांना आज जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे मलिक यांचा कारागृहातील मुक्काम कायम राहणार आहे. मात्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 30 नोव्हेंबर तारीख निश्चित केली आहे. 30 नोव्हेंबरला जामीन अर्जावर निकाल दिला जाणार आहे.

(बोलताना तारतम्य बाळगाल की नाही? राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजेंचा संताप; पवार, गडकरींनाही केला सवाल! )

कुर्ल्यातील जमीन खरेदी, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जामिना अर्जावर दोन्हीही पक्षकारांकडून मुंबई सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पारकर हिच्याकडून नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे.

नवाब मलिक यांचं प्रकरण नेमके काय आहे?

गोवावाला कंपाउंड खरेदी आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी सक्त वसुली संचालनालयाने नवाब मलिक यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने त्यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते.

(कर्नाटक आणि पाकिस्तानमध्ये काय फरक, सीएम बोम्मईंवर नीलम गोऱ्हेंचा प्रहार)

मलिकांवर मनी लाँड्रिंगचा आरोप

नवाब मलिक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे.

First published:

Tags: नवाब मलिक