मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राज्यपालांनी नाही त्या विषयात नाक खुपसण्याची गरज नाही', मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं

'राज्यपालांनी नाही त्या विषयात नाक खुपसण्याची गरज नाही', मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं

मुंबईची प्रगती ही गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या जीवावर झाली नाही. असल्या गोष्टी आम्ही कधीच खपवून घेणार नाही

मुंबईची प्रगती ही गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या जीवावर झाली नाही. असल्या गोष्टी आम्ही कधीच खपवून घेणार नाही

मुंबईची प्रगती ही गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या जीवावर झाली नाही. असल्या गोष्टी आम्ही कधीच खपवून घेणार नाही

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 30 जुलै : 'ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. ज्या गोष्टींचा आपल्याला इतिहास माहित नाही. त्या गोष्टीबद्दल राज्यपालांनी इतर विषयांमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही' अशा शब्दांत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विधानावरून राजकीय वातावरण पेटले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

'ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. ज्या गोष्टींचा आपल्याला इतिहास माहित नाही. त्या गोष्टीबद्दल राज्यपालांनी इतर विषयांमध्ये नाक खुपसण्याची गरज नये. मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली ती 105 जणांच्या हुतात्मामुळे मिळाली आहे. महाराष्ट्राने प्रगती स्वत:च्या जिवावर केली आहे. बाहेरून आलेल्या लोकांची प्रगती ही मुंबईत झाली आहे. मुंबईची प्रगती ही गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या जीवावर झाली नाही. असल्या गोष्टी आम्ही कधीच खपवून घेणार नाही, असं संदीप देशपांडे यांनी राज्यपालांना बजावले.

('..तर त्यांच्या गाड्यांचा चुराडा करू'; छत्रपतींच्या अवमानामुळे भडकले संतोष बांगर)

कोश्यारी यांनी केलेले हे विधान राज्यपालपदाला न शोभणारे आहे. त्यांनी राज्यपालपदाची गरिमा कायम राखली पाहिजे, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

'महाराष्ट्राची प्रगती ही मराठी माणसामुळे झाली आहे. मराठी माणसाने प्राणाची आहुती दिली आहे. पहिले जे राजकारणी होते त्यांनी महाराष्ट्रात उद्योग धंदे आणले, त्यामुळे राज्याचा विकास झाला, महाराष्ट्रामुळे ते आहे हे लक्षात घ्यावे, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

काय म्हणाले राज्यपाल?

'मी अनेक जणांना सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती लोकांना काढून टाका किंवा राजस्थानी लोकांनाही काढू टाका, जर गुजराती आणि राजस्थानी लोक सोडून गेले तर तुमच्याकडे कोणतेच पैसे उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं विधानच राज्यपालांनी केलं.

First published: