मुंबई, 28 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच आता त्यांच्यी अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. कारण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्यपालांकडून महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम 2015 (सुधारित) कलम 3 (1)(v) अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपाल आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या विधानामुळेअनुसूचित जाती सोबतच सर्वसामान्य लोकांची भावना दुखावली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्ता रमा अरविंद यांच्या वतीने अॅड. अमित कटारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
राजभवनातून आली महत्त्वाची माहिती
राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय पक्षांसह काही संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या राज्यात परत जाण्याची व्यक्त केली इ्च्छा केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. तसेच त्यांनी राज्यपाल पदावरुन पदमुक्त होण्याचे संकेत? दिले की काय, अशी चर्चा रंगली होती. अशी चर्चा रंगली असतानाच राजभवनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
वाचा - 'राज्यपालांना तातडीने पदावरुन दूर करा'; उदयनराजेंची थेट पंतप्रधानांकडे मागणी
राजभवनातून काय माहिती आली?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा देणार, याचं राज्यपालांनी खंडन केलं आहे. राजीनामा देण्याची इच्छा नसल्याचं राजभवनातून आलेल्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
राज्यपालांविरोधात संभाजीराजे आक्रमक
'छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहे' असं म्हणून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वादाला तोंड फोडले होते. पण, आठवडा उलटला तरीही राज्यपालांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी शिंदे सरकाराला कडक इशारा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Governor bhagat singh