नवी मुंबई, प्रमोद पाटील
नवी मुंबई, 28 नोव्हेंबर : नवी मुंबईतील नेरूळ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोव्यावरुन मालवणी मालाड येथे प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी सदर तरुणीसोबत तिचा मित्र देखील होता. तरुणीचा मृत्यू बस चालकामुळे झाल्याचा आरोप या मित्राने केला आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी येथे महापालिका रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
वाचा - मित्राच्या लग्नात इतका नाचला की मंडपातच तरुणाचा झाला धक्कादायक शेवट; पाहा Live Video
काय आहे प्रकरण?
मूळची मालवणी मालाड येथील असलेली मृत तरुणी गोवा राज्यातील कसिनोमध्ये मागील सहा महिन्यापासून काम करत होती. आपल्या घरी येण्यासाठी गोवावरुन ती बसमध्ये बसली. यावेळी तिच्यासोबत तिचा एक मित्रही होता. मात्र, बस सातारा येथे पोहचली असता मुलीला अस्वस्थ वाटू लागले. यावेळी बस थांबवण्याची विनंती चालकाला केली असता त्याने बस थांबवण्यास नकार दिला. सोबतच आपल्याला मारले आणि पैसेही घेतल्याचा आरोप सदर तरुणाने बस चालकावर केला आहे. बस नेरूळ येथे आणल्यानंतर डी. वाय. पाटील रुग्णालयात तरुणीला भरती करण्यात आले. मात्र, ती आधीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सध्या तरुणीचा मृतदेह शविच्छेदनासाठी वाशी मधील पालिका रुग्णालयात नेण्यात आला आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच पुढील तपास नेरूळ पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.