मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'देशातील महागाई कमी होवो...'! भाजप खासदार गिरीश बापट यांनी दिल्लीतून महाराष्ट्रातील जनतेला दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

'देशातील महागाई कमी होवो...'! भाजप खासदार गिरीश बापट यांनी दिल्लीतून महाराष्ट्रातील जनतेला दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनीही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत देशातली महागाई कमी होवो, यासाठी प्रार्थनाही केली आहे.

भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनीही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत देशातली महागाई कमी होवो, यासाठी प्रार्थनाही केली आहे.

भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनीही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत देशातली महागाई कमी होवो, यासाठी प्रार्थनाही केली आहे.

नवी दिल्ली 02 एप्रिल : आज गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2022) निमित्ताने राजकीय नेतेही नागरिकांसोबत संवाद साधत त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत. सकाळपासूनच नेते मंडळी नागरिकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. आता भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनीही शुभेच्छा देत देशातली महागाई कमी होवो, यासाठी प्रार्थनाही केली आहे.

भाजपला धक्का! शिवाजीराव नाईकांची घरवापसी; हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल

बापट म्हणाले, की आज पहिल्यांदाच पुणे सोडून दिल्लीमध्ये पाडवा साजरा करत आहे. आज खूप आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आजच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी एक संकल्पही केला पाहिजे की, सध्या देशाची परिस्थिती, आता देशातील महागाई, कोरोना संकट या सगळ्या पीडा निघून जावोत. तसंच मोदींच्या नेतृत्वाखाली जगाचे नेतृत्व करणाऱ्या भारत देशाची पुन्हा गती होवो. ही स्फूर्ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने येते. गुढी उभारणे म्हणजे संकल्प उभारणं आहे. संकल्प आणि सिद्धी यांच्यामधील अंतर प्रयत्नाने पूर्ण करायचं असतं. मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहे, अशा शब्दात बापट यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

'मेट्रोच्या उद्घाटनाला आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल पण...'; फडणवीसांचा सरकारवर निशाणा

देशावर मागील दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट होतं. आता देशात कोरोनाची प्रकरणं कमी झाली आहेत आणि अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र आता देशभरात महागाई सतत (Inflation) वाढतेच आहे. पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस, दूध अशा अनेक दररोज वापरायच्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. अशात सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा फटका बसणार आहे. आता दररोजच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. साबण, बिस्किट, कॉफी, डिटर्जेंट पावडर अशा दररोज लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याच पार्श्भूमीवर गिरीश बापट यांनी देशातील महागाई कमी होवो, अशी प्रार्थना केली आहे.

First published:
top videos

    Tags: Gudi padwa