मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : आवडता अभिनेता अमिताभ अन् अभिनेत्री? आदित्य ठाकरेंचं मिश्किल हास्य, मग म्हणाले...

Video : आवडता अभिनेता अमिताभ अन् अभिनेत्री? आदित्य ठाकरेंचं मिश्किल हास्य, मग म्हणाले...

आदित्य ठाकरेंना अनेक प्रश्न विचारण्यात आले, अगदी सकाळी उठल्यावर ते कोणतं अॅप पाहतात ते त्यांचं लग्न कधी होणार? पाहा Video ते काय म्हणाले..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 10 सप्टेंबर : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीदरम्यान अत्यंत मुद्देसूदपणे त्यांनी आपली भूमिका मांडली. CNN News18 च्या TOWN HALL या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी सध्याच्या राज्यातील सरकारवर त्यांनी निशाणा साधला.

मुंबईतील हिंदमाता या ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचलं नाही. आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळालं. असं म्हणताना त्यांनी सध्याच्या सरकारवरही निशाणा साधला. शिवसेनेतील 40 जणांच्या बंडखोरीबद्दल ते म्हणाले की, सर्वांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. यानंतर जनता जो काही निर्णय देईल, तो आम्ही स्वीकार करू.

बदला घेण्याबाबत त्यांचा विचारण्यात आलं होतं. यावर आदित्य म्हणाले की, बदला घेण्यावर मी विश्वास ठेवत नाही. बदला घेताना तुम्ही त्यात अडकून पडता आणि याचा तुम्हालाच त्रास होता. यापेक्षा मला आपल्या लोकांसोबत राहणं आणि त्यांच्यासाठी काम करणं अधिक महत्त्वाचं वाटतं.

मुलाखतीच्या शेवटी आदित्य ठाकरेंना यांना काही प्रश्न विचारण्यात आले.

-आदित्य ठाकरेंचं लूपवर असलेलें गाणं..

उत्तर - सध्या फार गाणी ऐकली जात नाही. एकतर काहीतरी वाचतो. कामासाठी फिरणं होतं. घरी आल्यावर मात्र मी झोपतो.

-आदित्य ठाकरे सध्या कोणतं पुस्तक वाचत आहे.

उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचं आणि दुसरं लीडरशीपसंदर्भातील पुस्तक.

-आवडतं खाद्यं

उत्तर - गोड खायला खूप आवडतं.

-सकाळी उठल्यावर आधी कोणतं अॅप चेक करता.

उत्तर - सकाळी उठल्यावर व्हॉट्सअॅप पाहत नाही. तर ट्विटर किंवा इन्स्टाग्राम पाहतो.

-शेवटा चित्रपट कोणता पाहिला.

उत्तर - टॉपगन

-आवडता अभिनेता

उत्तर - अमिताभ बच्चन

-आवडती अभिनेत्री..?

याबद्दल विचारल्यानंतर आदित्य ठाकरे मिश्लिक हसले. आणि याबाबत विचार केला नसल्याचं म्हणाले. त्यांना याबाबत वारंवार विचारण्यात आलं. मात्र शेवटपर्यंत त्यांनी उत्तर देणं टाळलं.

First published:

Tags: Aaditya Thackeray, Shivsena