मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING: संजय राऊतांना धक्का; 4 ॲागस्टपर्यंत ईडी कोठडी

BREAKING: संजय राऊतांना धक्का; 4 ॲागस्टपर्यंत ईडी कोठडी

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना ईडीची कोठडी (Sanjay Raut ED Custody) सुनावण्यात आली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना ईडीची कोठडी (Sanjay Raut ED Custody) सुनावण्यात आली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना ईडीची कोठडी (Sanjay Raut ED Custody) सुनावण्यात आली आहे.

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 01 ऑगस्ट : संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. 9 तास रविवारी संजय राऊत यांच्या निवासस्थानी कसून चौकशी केली गेली. यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आता दुपारी 2 वाजता संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आले. तर, 2 वाजून 15 मिनिटांनी त्यांना कोर्ट रुम नंबर 16 मध्ये विशेष इडी न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळी ईडीने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. कोर्टाने आता संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे ईडीचा युक्तीवाद -  - पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रविण राऊत फक्त नावाला होते. हे सगळे व्यवहार संजय राऊत यांनीच केले, असा गंभीर आरोप ईडीने केला आहे. ईडीने संजय राऊत यांची ८ दिवसांची ईडी कोठीच मागितली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे, असा दावाही ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी केला आहे. - सकाळी १० ते रात्री १० या दरम्यान संजय राऊत यांची चौकशी केली जाईल आणि ते त्यांच्या वकीलांना सकाळी ८.३० ते ९.३० या काळात भेटू शकतील संजय राऊत यांच्या अटकेवर आदित्य ठाकरे अखेर बोलले, ईडीबद्दल म्हणाले... संजय राऊत यांचे वकील अशोक मृंदरगी यांचा युक्तीवाद - - संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूने आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत. इतकी दिवस का कारवाई केली नाही. कारण ही कारवाई राजकीय हेतूने करायची होती, असा आरोप त्यांनी केला. - स्वप्ना पाटकर या महिलेशी काही कारणाने वाद झाले होते. त्याचा धागा पकडत हे आरोप करण्यात आले आणि ही कारवाई करण्यात आली. - वर्षा राऊत यांना जे पैसे मिळाले ते पैसे थेट खात्यात घेण्यात आले. जर गैरव्यवहाराचे पैसे घेतले असते तर ते बँक खात्याने घेतले असते का? - घर घेतले असेल किंवा जमिन घेतली असेल सर्व पैसे कायदेशीर रित्या चुकते केले. ते पैसे कायदेशीर मार्गाने कमावलेले होते - संजय राऊत हे ईडी चौकशीला सहकार्य करत नाहीत हा आरोप खोटा आहे. जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावले तेव्हा तेव्हा ते चौकशीला गेले. पण गेल्या काही दिवसात चौकशीला बोलावले गेले, तेव्हा राष्ट्रपती निवडणूक, राज्यसभा निवडणूक आणि इतर निवडणूका होत्या ज्याबाबत माहिती ईडीला दिली गेली होती
First published:

Tags: ED, Sanjay raut

पुढील बातम्या