मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राष्ट्रवादीच्या 5 बड्या नेत्यांवरही लवकरच ED ची कुऱ्हाड; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रवादीच्या 5 बड्या नेत्यांवरही लवकरच ED ची कुऱ्हाड; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

भाजप नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजप नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजप नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट : राष्ट्रवादीच्या बड्या पाच नेत्यांची लवकरच ईडीकडून चौकशी होणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. ही खळबळजनक माहिती माढ्याचे भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी दिली. लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी एका बड्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा यामध्ये समावेश असल्याचा दावा, खासदार निंबाळकर यांनी केला आहे. खासदार निंबाळकर यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या दहा पैकी पाच नेत्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे पाच बडे नेते कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे. BREAKING : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? ED कडून मुंबईत 2 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू! राष्ट्रवादीमध्ये कोणकोणत्या नेत्यांवर कारवाई होणार, हे लवकरच समोर येणार आहे. लवासा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बारा वर्षांनंतर समन्स बजावले आहे. यामध्ये सरकारने कारवाई करण्याचे धोरण ठरवले असेल तर यातून मोठा घोटाळा बाहेर येईल, असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले. खासदार निंबाळकर आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणामध्ये ईडी पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यानंतर राऊतांना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर ईडीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापे मारले आहे. कोण कोणत्या ठिकाणी छापे मारण्यात आले आहे, याबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे. मात्र, पत्राचाळ प्रकरणामध्येच ही कारवाई सुरू आहे. एकूण 2 टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ajit pawar, BJP, NCP

    पुढील बातम्या