मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'वंदे मातरम्' वरून शिंदे सरकारमध्ये मतभेद, मुनगंटीवारांच्या घोषणेला सत्तारांचा विरोध

'वंदे मातरम्' वरून शिंदे सरकारमध्ये मतभेद, मुनगंटीवारांच्या घोषणेला सत्तारांचा विरोध

 खातेवाटप जाहीर झाला असून सर्व मंत्री कामाला लागले आहे, पण दोन दिवस होत नाही तेच मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.

खातेवाटप जाहीर झाला असून सर्व मंत्री कामाला लागले आहे, पण दोन दिवस होत नाही तेच मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.

खातेवाटप जाहीर झाला असून सर्व मंत्री कामाला लागले आहे, पण दोन दिवस होत नाही तेच मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.

    मुंबई, 16 ऑगस्ट :  शिंदे सरकारच्या  खातेवाटप जाहीर झाला असून सर्व मंत्री कामाला लागले आहे, पण दोन दिवस होत नाही तेच मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॅलोऐवजी वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणावं, असं आवाहन केलं होतं. पण, शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी 'वंदे मातरम्' ला विरोध दर्शवला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयामध्ये कामकाजादरम्यान फोनवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे, असा निर्णय घेतला . पण त्यांच्या या निर्णयामुळे वाद पेटला आहे. विरोधकांनी या निर्णयावरून टीका केली आहे. पण आता शिंदे सरकारचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनीच विरोध दर्शवला आहे. 'खरं तर आपण महाराष्ट्रात राहतो जय महाराष्ट्र हा नारा असावा. शिवसेनेचा पहिला नारा हा जय महाराष्ट्र असतो. मी सुधीर मुनगंटीवार यांच्या विषयी काही बोलणे योग्य नाही. पण सगळ्यांनी जय महाराष्ट्रच बोलावे, असं स्पष्ट मत सत्तार यांनी व्यक्त केलं. सत्तार यांच्या या भूमिकेमुळे शिंदे सरकारमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. काय म्हणाले होते मुनगंटीवार? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. या खातेवाटपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक मंत्री करण्यात आलं. सांस्कृतिक मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या सूचना केल्या होत्या. 'इंग्रजांकडून किंवा परदेशातून आलेल्या हॅलो शब्दाऐवजी वंदे मातरम् शब्द वापरावा, असं अभियान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाने सुरू केलं आहे. वंदे मातरम् ऐवजी कुणी राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा तोडीचा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. हॅलो शब्द रझा अकादमीसाठी देशभक्तीला प्रेरणा देणारा असेल, तर प्रश्न उपस्थित होत नाही. आम्ही असा कोणताही कायदा केलेला नाही,' असं मुनगंटीवार म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या