मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मनावर दगड ठेवून.. चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर फडणवीसांचं पांघरुन, म्हणाले..

मनावर दगड ठेवून.. चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर फडणवीसांचं पांघरुन, म्हणाले..

मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर आता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर आता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर आता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई 23 जुलै : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पनवेलमध्ये पहिल्यांदाच भाजप कार्यकारणीची बैठक सुरू आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही उपस्थित आहेत. यावेळी राज्यातील सत्तातराबद्दल चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं ते यावेळी बोलताना म्हणाले. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले, की अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं. पुढे ते म्हणाले, की सलग पाच वर्षे त्यांनी यशस्वीपण मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत. त्यामुळे आता चला आपल्या घरी. कामाला लागू आणि जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत.

ठाकरेंच्या शिवसेनेने आमच्याशी बेईमानी केली, पण शिंदेंनी.. फडणवीसांचा पुन्हा मर्मावर घाव

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ : फडणवीस

कुठल्याही सरकारचे एकच मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री हेच नेते असतात. त्यामुळे आपले नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. ते मी याकरता सांगतोय की, मगाशी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी एवढंच सांगितलं, आपल्याला हे माहिती नव्हतं. आपल्याला वाटलं आपलंच सरकार येणार आहे. आपल्याला आपलाच मुख्यमंत्री होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे. अचानक हा निर्णय आल्यामुळे धक्का बसला. याचा अर्थ त्यांना किंवा आपल्या कुणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा आपलं वेगळं मत आहे, असं अजिबात नाही. तर त्या सगळ्या प्रक्रियेत आम्ही सगळे एकत्रित होतो. आता हे चालत असतं. माध्यमांचं काम असतं. ते त्यांचं काम करत असतात. आता शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे. हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळा पूर्ण करेलच त्यासोबत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल.

First published:

Tags: Chandrakant patil, Devendra Fadnavis