मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संभाव्य मंत्र्यांसोबत फडणवीसांची डिनर डिप्लोमसी? नाराजांना शांत करण्याचं आव्हान

संभाव्य मंत्र्यांसोबत फडणवीसांची डिनर डिप्लोमसी? नाराजांना शांत करण्याचं आव्हान

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 8 ऑगस्ट : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल महिन्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. उद्या मंगळवारी सकाळी शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांना शपथ दिली जाणार आहे. भाजप आणि शिंदे गटातून काही नावंही निश्चित झाली आहे. या सर्व लोकांना आजच मुंबईत पोहचण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. ज्यांना निरोप भेटला ते नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. यात आतापर्यंत भाजपची काही नावे समोर आली आहेत. दरम्यान, आज रात्री 9 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे. काय आहे डिनर डिप्लोमसी? शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता. यामुळे विरोधकांकडून सातत्याने टीका होत होती. सत्ताधारी देखील वारंवार लवकरच यापलीकडे कोणतीही माहिती देत नव्हते. मात्र, अखेर आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यासाठी संभाव्य मंत्र्यांना फोन करुन मुंबईत बोलवण्यात आलं आहे. या संभाव्य मंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिनर डिप्लोमसी करणार आहेत. आज रात्री 9 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही पक्षाकडून मंत्रिपदासाठी अनेक लोक इच्छूक आहेत. शिवाय मनासारखे खातं मिळालं नाही तरी आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आगामी भूमिका कशी असावी या सदर्भात चर्चा महत्त्वाची आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ह्या डिनर डिप्लोमसीचे नियोजन केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा याशिवाय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणा जारी करण्यात आली आहे. उद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. मविआच्या निर्णयांना स्थगिती सुरुच! आता MIDC संदर्भातील नव्या GR ने ठाकरेंना झटका भाजपा यादी संभाव्य यादी खालील प्रमाणे : 1) चंद्रकांत दादा पाटील 2) राधा कृष्ण विखे पाटील 3) सुधीर मुनंगटीवार 4) गिरिष महाजन 5) सुरेश खाडे, मिरज 6) अतुल सावे 7) मंगलप्रभात लोढा 8) रविंद्र चव्हाण या 8 जणांना मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट,अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रिपद दिले जात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घड़ामोड़ीमुळे काही नावावर फेरविचार होऊ शकतो. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असाचा अशी दोघांची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

पुढील बातम्या