मुंबई 17 जुलै : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळताच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंडखोर शिवसेना आमदारांना (Rebel MLA's) उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अनेकदा परत बोलावण्याचे प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करणार नसल्याच्या निर्णयावर बंडखोर ठाम होते. शिवसेनेची भाजपसोबतच नैसर्गिक युती असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. अशात उद्धव ठाकरे खरंच पुन्हा भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. यादरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
कोल्हापुरातही शिवसेना फुटली? दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर, घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेला?
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed Tweet) यांच्या एक ट्विटनंतर राज्यात मोठ्या नवीन राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं. शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेत्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल.'
@OfficeofUT @mieknathshinde @TawdeVinod @Pankajamunde pic.twitter.com/20JnC3QSma
— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022
दिपाली सय्यद यांच्या या ट्विटनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या म्हणण्यानुसार भाजपसोबत जाण्यास तयार होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतो. दिपाली सय्यद यांनी भाजपनेही दोघांची भेट घडवून आणण्यासाठी मदत केल्याचा उल्लेख केला आहे.
संजय राऊतांचा संविधानाचा दाखला देत राज्यपालांना सवाल, भाजपच्या अॅडव्होकेट आमदाराकडून सडेतोड उत्तर
यापूर्वी एक दिवस आधीच दिपाली सय्यद यांनी आणखी एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी म्हटलं होतं, की 'लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे. शिवसेना हा गट नसून हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Uddhav thackeray