मुंबई, 5 सप्टेंबर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. मिस्त्री मर्सिडीज कारने प्रवास करीत होते. ही कार खूप सुरक्षित मानली जाते. या कारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण फिचर्स आहे, ज्यामुळे अपघातानंतरही कारमध्ये बसलेले प्रवासी सुरक्षित राहतील. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक विविध प्रकारचे सवाल उपस्थित करीत आहेत.
इतकी सुरक्षित कार असतानाही कसा झाला मृत्यू?
ज्या मर्सिडीज कारने सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र प्रवास करीत होते, त्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यात स्पष्ट दिसत आहे की, कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. ड्रायव्हर सीट आणि शेजारील सीटचंही नुकसान झालं आहे. कार ड्राइव्ह करणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोले आणि शेजारच्या सीटवर बसलेले पती गंभीर जखमी झाले आहेत.
पारशींचं पवित्र तीर्थस्थळाहून परतत असताना काळाचा घाला, सायरस मिस्त्रींसाठी ठरलं ते शेवटचं दर्शन
या अपघातात मागे बसलेले मिस्त्री आणि अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कारच्या समोर बसलेल्यांना फार त्रास झाला नाही, मात्र मागे बसलेल्यांचा मृत्यू कसा झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागे बसलेल्या दोघांच्या मृत्यूचं नेमकं काय कारण आहे, याबाबत लोकांकडून शंका निर्माण केली जात आहे. विशेष म्हणजे मर्सिडीज कारमध्ये एकूण सात एअरबॅग्स असतात. मागच्या एअरबॅग्स का उघडल्या गेल्या नाहीत? दरम्यान कारची तपासणी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीकडून टीम पाठवण्यात आली आहे. हे कारची स्थितीची तपासणी करीत आहे. कारमधील फिचर्स व्यवस्थित काम करीत होते की, नाही याबाबत आणि इतक तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढे बसलेल्या दोघांनीही सीटबेल्ट लावला होता. मात्र मागे बसलेल्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. त्यामुळे जेव्हा कार डिव्हायरडला धडकली तेव्हा मागे बसलेले सायरस मिस्त्री पुढे आले आणि एअरबॅग उघडण्यापूर्वीच त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पुढे असंही सांगितलं की, अपघातावेळी मिस्त्रींची कार दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करीत होती आणि कारची गतीही जास्त होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratan tata, Road accident, Tata group