मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

यंदाच्या वर्षी हापुसला मुकणार? कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

यंदाच्या वर्षी हापुसला मुकणार? कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

आंबा
आंबा हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे एक लोकप्रिय फळ आहे. आंबा हे बहुतेक लोकांच्या उन्हाळ्यातील सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे. आंबा हृदय निरोगी ठेवतो. त्यात फायबर, पोटॅशियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. पोटॅशियम वाढवणे आणि सोडियमचे प्रमाण कमी करणे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आंबा फायदेशीर आहे.

आंबा आंबा हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे एक लोकप्रिय फळ आहे. आंबा हे बहुतेक लोकांच्या उन्हाळ्यातील सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे. आंबा हृदय निरोगी ठेवतो. त्यात फायबर, पोटॅशियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. पोटॅशियम वाढवणे आणि सोडियमचे प्रमाण कमी करणे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आंबा फायदेशीर आहे.

सद्य परिस्थिती पाहता नागरिक यंदाच्या वर्षी हापुसला मुकणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

मुंबई, 19 मार्च : निसर्गाच्या बदलामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांवर अस्समानी संकट आलं आहे. बदलते हवामान व अवकाळी पावसाने आंबा बागायतदार उध्वस्त झालं असून निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ, कोविड, अवकाळी पावसाने आंबा उत्पादनाला फटका बसला आहे.

आंब्यावर मावा व तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. मोहर टिकविण्यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च वाढला असून केवळ 15 ते 20 टक्के उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा हापुसची गोडी महागणार असल्याचं चित्र आहे. आंबा बागायतदाराला जगवण्यासाठी मायबाप सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आंबा हा फळांचा राजा आहे. हे जगमान्य झालं असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचं आणि पैसे मिळवून देणारं फळपिक झालं  आहे. कोकणातील हापुस चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. यंदा हापुसची गोडी महागणार असल्याचे चित्र दिसून येते. कोकणातील आंबा उत्पादकांना बदलते हवामान, ऊष्मा व अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. आंबा बागायतदार पूर्णपणे कोलमडून गेला आहे. यंदा हापूस आंबा चाखायला तरी मिळेल की नाही ही धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे.

आंबा पिकाचे घटते उत्पादन चिंताजनक असून आंब्याच्या असंख्य प्रजाती टिकवने, आता मोठे आव्हान झाले आहे. बदलत्या हवामानाचा गंभीर परिणाम आंबा उत्पादनावर होत असल्याने केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलून शेतकरी व बागायतदार यांना भक्कमपणे उभे राहण्यासाठी आर्थिक भरिव मदत व सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे ही वाचा-महाराष्ट्रासह 5 राज्यात अवकाळी पावसाचे ढग, येत्या 3 तासात याठिकाणी बरसणार सरी

आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारताचा तसेच महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र ३,५७,२ ९ ० हेक्टर आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात होत असून त्यापासून शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे पैसा मिळतो. मात्र सद्य परिस्थिती पाहता नागरिक यंदाच्या वर्षी हापुसला मुकणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

First published: