मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचीही शिवसेनेला साथ, शिंदे गटाला ओपन चॅलेंज

अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचीही शिवसेनेला साथ, शिंदे गटाला ओपन चॅलेंज

नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांचा फाईल फोटो

नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांचा फाईल फोटो

या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 05 ऑक्टोबर : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. आता काँग्रेसने सुद्धा शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला असून उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आह, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे

(शिंदे गटाची मोठी खेळी, शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्यासाठी असा आहे प्लॅन?)

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

(मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर, शिवसेना आणि शिंदे गटामध्ये थेट लढत)

'भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील असंही नाना पटोले म्हणाले.

First published:

Tags: Marathi news