मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : एअर इंडिया कॉलनीत 2017मध्ये काँग्रेसची जादू, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

BMC Election 2022 : एअर इंडिया कॉलनीत 2017मध्ये काँग्रेसची जादू, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 83मध्ये याठिकाणी काँग्रेस उमेदवार विन्नी डिसोजा या निवडून आल्या होत्या.

2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 83मध्ये याठिकाणी काँग्रेस उमेदवार विन्नी डिसोजा या निवडून आल्या होत्या.

2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 83मध्ये याठिकाणी काँग्रेस उमेदवार विन्नी डिसोजा या निवडून आल्या होत्या.

    मुंबई, 27 जुलै खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही (BMC Election 2022) लवकरच जाहीर होईल. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 83 एअर इंडिया कॉलनीबाबत (Ward no. 83) विचार केला तर याठिकाणी 2017च्या मनपा निवडणुकीत काँग्रेसची (Congress) जादू चालली होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय विशेष आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 83 बद्दल. वार्ड क्रमांक 83 मध्ये आंबेडकर नगर, बमावाडा, पी अँड टी कॉलनी, एअर इंडिया कॉलनी या भागाचा समावेश होतो. 2011 च्या जनगणनेनुसार, वॉर्ड क्रमांक 83 ची लोकसंख्या 50184 होती. त्यात अनुसूचित जातीचे 2252, तर अनुसूचित जमातीचे 644 नागरिक होते. 2017च्या मनपा निवडणुकीत याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विन्नी जिसूजा विजयी झाल्या होत्या. त्यांना 7558 इतकी मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, काँग्रेस आणि मिळालेली मते -
    1. विन्नी बाप्टिस्ट डिसोझा, काँग्रेस - 7558
    2. निधी सावंत, शिवसेना - 6953
    3. पुर्णिमा माने, भाजप - 5548
    4. सोनाली सातपुते, मनसे - 1554
    5. सुजाता आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस - 221
    6. अश्विनी अधिकारी, अखिल भारतीय सेना - 146
    2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 83मध्ये याठिकाणी काँग्रेस उमेदवार विन्नी डिसोजा या निवडून आल्या होत्या. त्यावेळी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत झाल्याचे पाहायला मिळाले होते. मागच्या वेळी शिवसेना-भाजपचे सरकार होते. तरी काँग्रेस याठिकाणी जिंकला होता. यावेळी राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक रंजक होणार आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावेळी काय होते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या