मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : आंबोली वार्डात यावेळीही काँग्रेसची जादू चालणार की समीकरण बदलणार?

BMC Election 2022 : आंबोली वार्डात यावेळीही काँग्रेसची जादू चालणार की समीकरण बदलणार?

वार्ड क्रमांक 65 हा मागच्या वेळी ओबीसी महिलांसाठी राखीव होता. त्यामुळे 2017च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अल्पा अशोक जाधव यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांना 7820 इतकी मते मिळाली होती.

वार्ड क्रमांक 65 हा मागच्या वेळी ओबीसी महिलांसाठी राखीव होता. त्यामुळे 2017च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अल्पा अशोक जाधव यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांना 7820 इतकी मते मिळाली होती.

वार्ड क्रमांक 65 हा मागच्या वेळी ओबीसी महिलांसाठी राखीव होता. त्यामुळे 2017च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अल्पा अशोक जाधव यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांना 7820 इतकी मते मिळाली होती.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक 65 आंबोलीमध्ये (Ward no 65) मागच्या वेळी काँग्रेसची जादू चालली होती. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी काँग्रेस (Congress) उमेदवार अल्पा अशोक जाधव या निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 65बाबत. वार्ड क्रमांक 65 हा मागच्या वेळी ओबीसी महिलांसाठी राखीव होता. त्यामुळे 2017च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अल्पा अशोक जाधव यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांना 7820 इतकी मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - अल्पा अशोक जाधव, काँग्रेस - 7820 माया संतोषसिंग राजपूत, भाजप - 6515 आयरे नूतन प्रसाद, शिवसेना - 5833 अगवान बिदुल कादर, भाकप (मार्क्सवादी) - 406 अल्मास कुरेशी, एमआयएम - 1178 अवंतिका विलास राऊत, मनसे - 589 महापालिका प्रशासनाने 2022च्या पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर केलीय. 2017 च्या निवडणुकीत हा वार्ड ओबीसी महिलासाठी राखीव होता. मात्र, आता हा वार्ड या खुला आहे. वार्ड क्रमांक 65ची एकूण लोकसंख्या 54281 इतकी आहे. त्यात अनुसूचित जाती 1 हजार 424, तर अनुसूचित जमातीचे 173 नागरिक आहेत. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर वार्ड क्रमांक 65मध्ये याठिकाणी 2017च्या मनपा निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले होते. यावेळच्या निवडणुकीची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 65मधील जनता पुन्हा एकदा काँग्रेसला संधी देते की अन्य दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला संधी देतात, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या