मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : क्रॉफर्ड मार्केट वार्डात 2017ला काँग्रेस-एमआयएममध्ये झाली प्रमुख लढत, यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : क्रॉफर्ड मार्केट वार्डात 2017ला काँग्रेस-एमआयएममध्ये झाली प्रमुख लढत, यावेळी काय होणार?

वार्ड क्रमांक 224मध्ये अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे मुस्लिम मतदाराकडे सर्वांचे लक्ष असते. मागच्या वेळी 46355 इतके मतदार होते. त्यापैकी 19482 वैध मतदान झाले होते.

वार्ड क्रमांक 224मध्ये अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे मुस्लिम मतदाराकडे सर्वांचे लक्ष असते. मागच्या वेळी 46355 इतके मतदार होते. त्यापैकी 19482 वैध मतदान झाले होते.

वार्ड क्रमांक 224मध्ये अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे मुस्लिम मतदाराकडे सर्वांचे लक्ष असते. मागच्या वेळी 46355 इतके मतदार होते. त्यापैकी 19482 वैध मतदान झाले होते.

  मुंबई, 27 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 224चा (Ward no. 224) विचार केला तर याठिकाणी काँग्रेसने (Congress Candidate) बाजी मारली होती. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 224 क्रॉफर्ड मार्केट बद्दल. मुंबईतील वार्ड क्रमांक 224 हा दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा वार्ड आहे. या वार्डात महात्मा फुले मार्केट (क्रॉफर्ड मार्केट) पायधुनी, व्हिक्टोरिया डॉक, बंगाली पुरा, कोळीवाडा, मांडवी या भागांचा समावेश होतो. व्यापारी ठिकाण अशी सुद्धा या वार्डाची ओळख आहे. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाला होता. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि एआयएमआयएम अशा चारच पक्षांमध्ये याठिकाणी लढत रंगली होती. विजय काँग्रेस उमेदवार आफरिन जावेद शेख यांना 7881 मते मिळाली होती. दोन नंबरवर एमआयएम पक्ष राहिला. 2017च्या मनपा निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
  1. आफरिन जावेद शेख, काँग्रेस - 7881
  2. हफिजी तयबा मोहम्मद जाफर, एमआयएम - 5854
  3. सरला रमेश गवादे, भाजप - 3001
  4. विजयश्री शैलेंद्र साखरे, शिवसेना - 2605
  वार्ड क्रमांक 224मध्ये अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे मुस्लिम मतदाराकडे सर्वांचे लक्ष असते. मागच्या वेळी 46355 इतके मतदार होते. त्यापैकी 19482 वैध मतदान झाले होते. वार्ड क्रमांक 224 चे नाव मुंबई शहराचे पहिले मनपा आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांच्या नावावर होते. मात्र, नंतर ते ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या नावावर बदलण्यात आले. त्यामुळे क्रॉफर्ड मार्केटला महात्मा ज्योतिबा फुले मंडईपण म्हटले जाते. हे मार्केट पोलीस मुख्यालयासमोर, सीएसटी रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला आणि जेजे रुग्णालयाच्या पश्चिम दिशेला आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 224मध्ये काँग्रेस आणि एमआयएममध्ये मुख्य लढत झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी मतदार राजा कुण्याच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालतो, हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
  First published:

  Tags: BMC, Election, Mumbai

  पुढील बातम्या