मुंबई, 6 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला.
वार्ड क्रमांक 223मध्ये उमरखाडी, प्रिन्सेस डॉक, वाडी बंदर हा परिसर येतो. 2017मध्ये वार्ड क्रमांक 223मध्ये काँग्रेस उमेदवार निकीता ज्ञानराज निकम निवडून आल्या होत्या. त्यांना 8634 मते मिळाली होती. तर त्यापाठोपाठ शिवसेना आणि एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवारांना मते मिळाली होती.
2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
- आशा परमेश मामिडी, शिवसेना - 5442
- निकीता ज्ञानराज निकम, काँग्रेस - 8634
- निदा फातिमा शाहीद अहमद शेख, समाजवादी पार्टी - 1376
- अन्सारी वकरुनिया जाहीद हुसैन, एमआयएम - 4887
- सुरेखा पांडुरंग बढे, मनसे - 793
- अलमास यासिन भट्टी, अपक्ष -48
- शर्मिन मोहम्मद इरफान डोसा, राष्ट्रवादी - 218
- इद्रिस रेश्मा मोहम्मद नबी, अपक्ष - 26
- कादरी शमीम सय्यद फक्रुद्दीन, अपक्ष - 30
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका
नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे.
शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेकडे पाहिले जाते. मागच्या वेळी या वार्ड क्रमांक 223मधून काँग्रेस उमेदवार निवडून आला होता. निवडणुकीची रंगत आगामी काळात पाहायला मिळणार आहे. वार्ड क्रमांक 223मधील मतदार कुणाच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.