मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो वार्डात जनता यावेळीही काँग्रेसला साथ देणार का?

BMC Election 2022 : अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो वार्डात जनता यावेळीही काँग्रेसला साथ देणार का?

वार्ड क्रमांक 213मध्ये अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो, टाटा हाऊसिंग, जिजामाता नगर, भव्य सुप्रीम या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 213मध्ये अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो, टाटा हाऊसिंग, जिजामाता नगर, भव्य सुप्रीम या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 213मध्ये अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो, टाटा हाऊसिंग, जिजामाता नगर, भव्य सुप्रीम या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

    मुंबई, 9 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 213मध्ये (Ward no. 213) मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) वर्चस्व दिसले होते. काँग्रेसचे जावेद जुनेजा याठिकाणी विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 213बाबत. वार्ड क्रमांक 213मध्ये अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो, टाटा हाऊसिंग, जिजामाता नगर, भव्य सुप्रीम या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 213मध्ये काँग्रेस उमेदवार जावेद जुनेजा हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुनील कदम यांचा पराभव केला होता. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागच्या वार्डातील या जनतेने काँग्रेसला साथ दिली होती. यावेळी काय होते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या